१२ लाखांतून खुली व्यायामशाळा, साहित्याची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:37 AM2021-05-10T04:37:13+5:302021-05-10T04:37:13+5:30

चामोर्शी शहरातील आठवडी बाजार चौकाजवळील हनुमान मंदिराजवळ १५ व्यायामसाहित्य, मुख्य हायवे रस्त्यालगत असलेल्या मिरची बाजार या ठिकाणी १० व्यायामसाहित्य; ...

12 lakhs open gymnasium, material facilities | १२ लाखांतून खुली व्यायामशाळा, साहित्याची सुविधा

१२ लाखांतून खुली व्यायामशाळा, साहित्याची सुविधा

Next

चामोर्शी शहरातील आठवडी बाजार चौकाजवळील हनुमान मंदिराजवळ १५ व्यायामसाहित्य, मुख्य हायवे रस्त्यालगत असलेल्या मिरची बाजार या ठिकाणी १० व्यायामसाहित्य; तर डॉ. आंबेडकर चौकाजवळ असलेल्या दिना कॉलनीजवळील मोकळ्या पटांगणातील जागेत पाच व्यायामसाहित्य व खेळणी लावण्यात आली आहेत.

चामोर्शी शहरात एकाही ठिकाणी तरुण मुलांना व नागरिकांना व्यायाम करण्यासाठी साहित्याची व्यवस्था नव्हती; परंतु नगरपंचायत प्रशासनाने या योजनेअंतर्गत लावण्यात आलेले ३० खुल्या व्यायामशाळांचे साहित्य चामोर्शीकरांना प्रेरणादायी ठरत आहेत. तरुण मुले या ठिकाणी जाऊन व्यायाम करीत असताना दिसून येत आहेत, अशी माहिती नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने अभियंता निखिल कारेकर यांनी दिली.

बॉक्स

सुदृढ व तंदुरुस्त आरोग्य राहण्यास मदत

शहरात कुठेही खुली जागा नसल्याने अनेकजण घरीच व्यायाम करीत असतात; तर माॅर्निंग वाॅकसाठी आष्टी, मूल, गडचिरोली, घोटकडे जाणाऱ्या मार्गावर फिरायला जाणाऱ्याची संख्या दिसून येत आहे. मात्र नगरपंचायत प्रशासनाने कोरोनाकाळात तीन ठिकाणी खुल्या व्यायामशाळेचे साहित्य लावल्याने ते शहरातील युवकांना सोयीचे ठरू लागले आहे. शरीर सुदृढ राहण्यासाठी अन्नासोबत चांगल्या व्यायामाची नितांत गरज असते. सध्या जो तो आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आरोग्याची काळजी घेऊ लागला असताना नगरपंचायत प्रशासनाने खुल्या व्यायामशाळा उपलब्ध करून दिल्याने नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: 12 lakhs open gymnasium, material facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.