आलापल्लीच्या शिबिरात १२ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:37 AM2021-05-10T04:37:15+5:302021-05-10T04:37:15+5:30

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप बघता ठिकठिकाणी रुग्णांना रक्त व प्लाझ्माची गरज भासत आहे. त्यामुळे सध्याच्या कठीण काळात युवकांनी ...

12 people donated blood in Alapally camp | आलापल्लीच्या शिबिरात १२ जणांनी केले रक्तदान

आलापल्लीच्या शिबिरात १२ जणांनी केले रक्तदान

Next

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप बघता ठिकठिकाणी रुग्णांना रक्त व प्लाझ्माची गरज भासत आहे. त्यामुळे सध्याच्या कठीण काळात युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून रक्ताची निकड पूर्ण करून राष्ट्रसेवेत हातभार लावावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व डॉ. हेडगेवार सेवा समिती चंद्रपूरतर्फे करण्यात येत आहे.

यावेळी रक्तदान शिबिरात अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी विभागाच्या सरिता वाघ, निखिल कोंडपर्ती, शरद बांबोळे, मेहराज शेख यांनी सहकार्य केले. रक्तदानापूर्वी अँटिजन कोविड टेस्ट करूनच रक्तदान करण्यात आले. विभाग सहकार्यवाह जयप्रकाश शेंडे, जिल्हा कार्यवाह गजानन गादेवार, विहिंपचे जिल्हा अध्यक्ष सीताराम सोनानिया, जिल्हा मंत्री अमित बेजलवार, भाजप अनुसूचित जमाती आघाडीचे प्रदेश सदस्य संदीप कोरेत, आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम यांनी रक्तदान शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांचे मनोबल उंचावले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सेवा प्रमुख श्रीनिवास गौतम, कार्यकरिणी सदस्य सुरेश गड्डमवार, तालुका कार्यवाह मंगेश परसावार, धर्मजागरण प्रमुख पूनम बुधावार, बळीराम मोहुर्ले, मोहन मदने, किशोर धकाते, नमन नागपूरवार, सफल शेंडे, अभिजित शेंडे, अंकुश शेंडे, मिलिंद खोंड आदींनी सहकार्य केले.

Web Title: 12 people donated blood in Alapally camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.