१० महिन्यांत १२ व्याघ्रबळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:44 AM2021-09-08T04:44:29+5:302021-09-08T04:44:29+5:30

गडचिरोली आणि वडसा वनविभागाच्या क्षेत्रात एकच वाघ नसला तरी नेमका कोणता वाघ हल्लेखोर झाला आहे हे शोधण्याचे आव्हान वनविभागापुढे ...

12 tiger victims in 10 months | १० महिन्यांत १२ व्याघ्रबळी

१० महिन्यांत १२ व्याघ्रबळी

Next

गडचिरोली आणि वडसा वनविभागाच्या क्षेत्रात एकच वाघ नसला तरी नेमका कोणता वाघ हल्लेखोर झाला आहे हे शोधण्याचे आव्हान वनविभागापुढे होते. त्यानुसार ट्रॅप कॅमेरे आणि ड्रोनच्या मदतीने वाघांवर पाळत ठेवण्यात आली. १८ गावांतील शेतकरी व नागरिकांनी गडचिरोली वनवृत्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर वनविभागाने वाघाला पिंजऱ्यात अडकविण्याची परवानगी मिळवली. त्यानुसार आता पिंजरेही लावले आहेत. मात्र, धुमाकूळ घालणाराच वाघ त्या पिंजऱ्यात अडकेल की दुसराही हे तूर्त तरी ठामपणे सांगणे कठीण झाले आहे.

(बॉक्स)

परिक्षेत्रनिहाय बळी

पोर्ला - ७

चातगाव - २

गडचिरोली - १

घोट - १

अहेरी - १

(बॉक्स)

७ बळींच्या परिवाराला प्रत्येकी १५ लाख

२५ डिसेंबर २०२० पासून आतापर्यंत वाघ-बिबट्याच्या हल्ल्यातील ७ मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी १५ लाखांची मदत वनविभागाने दिली. चार बळींच्या प्रकरणात तातडीची १० हजारांची मदत देण्यात आली असून पुढील मदत देण्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

(बॉक्स)

नवेगाव-नागझिऱ्यातील चमूही दाखल

धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला पकडण्यासाठी पोर्ला वनपरिक्षेत्रात २ ठिकाणी पिंजरे लावले आहेत. गडचिरोली वनपरिक्षेत्राच्या हद्दीतही २ पिंजरे लावण्याचे काम सुरू असून मार्गदर्शन करण्यासाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची चमूही गडचिरोलीत डेरेदाखल होत आहे. त्यामुळे लवकरच वाघाला जेरबंद करून नागरिकांना दहशतमुक्त वातावरण मिळेल, अशी आशा केली जात आहे.

Web Title: 12 tiger victims in 10 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.