12,756 शिक्षकांची हाेणार काेराेना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 05:00 AM2020-11-21T05:00:00+5:302020-11-21T05:00:14+5:30
पहिला शैक्षणिक सत्र संपला आहे. तरीही अजूनपर्यंत शाळा सुरू झाल्या नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे माेठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने २३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळा सुरू करतानाच काेराेनाचा संसर्ग विद्यार्थ्यांना हाेऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययाेजना करण्याचे निर्देश सुद्धा शासनाने दिले आहेत. यासाठी स्वतंत्र शासन निर्णय काढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : २३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू हाेणार आहेत. या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांना काेराेना तपासणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने नियाेजन केले असून २ हजार ७५६ शिक्षकांची काेराेना चाचणी अपेक्षित आहे.
पहिला शैक्षणिक सत्र संपला आहे. तरीही अजूनपर्यंत शाळा सुरू झाल्या नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे माेठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने २३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळा सुरू करतानाच काेराेनाचा संसर्ग विद्यार्थ्यांना हाेऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययाेजना करण्याचे निर्देश सुद्धा शासनाने दिले आहेत. यासाठी स्वतंत्र शासन निर्णय काढला आहे. त्यामध्ये नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांची काेराेना तपासणी आवश्यक केली आहे. जिल्ह्यात २ हजार ७५६ शिक्षकांची तपासणी हाेणे अपेक्षित आहे. शिक्षकाची चाचणी पाॅझिटीव्ह आल्यास त्याला अध्यापन करण्यास मनाई केली जाणार आहे.
तालुकास्तरावर सुविधा
तालुकास्तरावर असलेल्या ग्रामीण रुग्णालयात काेराेनाची चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एकाच वेळी गर्दी उसळू नये, यासाठी प्रत्येक शाळेच्या शिक्षकांना दिवस ठरवून दिला आहे.
शाळा सुरू करण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार स्वच्छता व शाळेत साेयीसुविधा पुरविण्याविषयी शाळांना निदेर्श दिले आहेत. काही शाळांना शिक्षण विभागाचे अधिकारी भेटी देऊन पाहणी करीत आहेत. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांची काेराेना तपासणी करण्याचे काम सुरू झाले आहे. साेमवारपर्यंत संपूर्ण शिक्षकांच्या चाचणी आटाेपतील. त्यानंतर इतर पाचवी ते आठवीच्या शिक्षकांंची तपासणी हाेईल.
- रमेश उचे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक)