१३ कोटींचे धान चुकारे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:26 AM2019-04-13T00:26:15+5:302019-04-13T00:26:51+5:30

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने सन २०१८-१९ या वर्षाच्या खरीप हंगामात गडचिरोली व अहेरी कार्यालय मिळून जिल्हाभरात एकूण १० लाख १० हजार ३५८ क्विंटलची धान खरेदी ८६ केंद्रांवरून करण्यात आली.

13 Crore pumped out of paddy | १३ कोटींचे धान चुकारे प्रलंबित

१३ कोटींचे धान चुकारे प्रलंबित

Next
ठळक मुद्देखरीप हंगाम संपला : आदिवासी विकास महामंडळाची धान खरेदी १० लाख क्विंटलवर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने सन २०१८-१९ या वर्षाच्या खरीप हंगामात गडचिरोली व अहेरी कार्यालय मिळून जिल्हाभरात एकूण १० लाख १० हजार ३५८ क्विंटलची धान खरेदी ८६ केंद्रांवरून करण्यात आली. सदर धान खरेदी पोटी शेतकऱ्यांना आत्तापर्यंत १६३ कोटी ७७ लाखाचे धान चुकारे अदा करण्यात आले. अद्यापही २ हजार ४०२ शेतकऱ्यांचे १३ कोटी ४ लाख १९ हजार रूपयांचे धान चुकारे प्रलंबित आहेत.
आदिवासी विकास विभागाच्या वतीने गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५१ केंद्रांवरून यंदाच्या खरीप हंगामात १२७ कोटी ३८ लाख २६ हजार रूपये किमतीच्या एकूण ७ लाख २७ हजार ९०० क्विंटल इतकी धान खरेदी करण्यात आली. एकूण २५ हजार ३१९ शेतकºयांनी गडचिरोली कार्यालयाच्या हद्दीतील ५१ केंद्रांवर धानाची विक्री केली. यापैकी २४ हजार ५४६ शेतकºयांना १२३ कोटी २६ लाख ३८ हजार रूपयांचे धान चुकारे अदा करण्यात आले. अद्यापही ७७३ शेतकºयांचे ४ कोटी ११ लाख ८८ हजार रूपयांचे धान चुकारे प्रलंबित आहेत.
अहेरी कार्यालयांतर्गत यंदाच्या खरीप हंगामात एकूण ३५ केंद्रांवर आविका संस्थांमार्फत धानाची खरेदी करण्यात आली. अहेरी उपविभागात एकूण ४९ कोटी ४३ लाख रूपये किमतीच्या २ लाख ८२ हजार ४५७ क्विंटल इतकी धान खरेदी करण्यात आली. यापैकी ४० कोटी ५० लाख रूपयांचे धान चुकारे संबंधित शेतकºयांना अदा करण्यात आले. अद्यापही १ हजार ६२९ शेतकºयांचे ८ कोटी ९२ लाख ३१ लाख रूपयांचे धान चुकारे प्रलंबित आहेत. परिणामी हे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत १० केंद्रांवरून २७ कोटी ६४ लाख ६७ हजार रूपये किमतीच्या १ लाख ५७ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. कोरची उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत १३ केंद्रांवरून १ लाख ७२ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली असून या धानाची किंमत ३० कोटी १० लाख ३३ हजार रूपये आहे. आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत ९ केंद्रांवरून एकूण १ लाख ५४ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. या धानाची किंमत २७ कोटी १० लाख रूपये आहे. धानोरा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत ९ केंद्रांवरून १ लाख १० हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. घोट उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत १० केंद्रांवरून १ लाख ३२ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली.

मागील हंगामाच्या तुलनेत धान खरेदी वाढली
यंदाच्या तुलनेत गतवर्षीच्या खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात धानाचे उत्पादन कमी झाले होते. परिणामी आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रांवर धानाची आवक कमी झाली. मात्र यंदाच्या हंगामात धानाचे उत्पादन बºयापैकी झाले. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाची धान खरेदी यंदाच्या हंगामात जवळपास दोन ते अडीच लाख क्विंटलने वाढली.
मध्यंतरीच्या काळात आविका संस्थांच्या अनेक केंद्रांवर बारदान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी त्यावेळी बºयाच केंद्रावरची धान खरेदी प्रभावित झाली. मात्र त्यानंतर महामंडळाने आवश्यक त्या केंद्रावर बारदान्याचा पुरवठा केला. मार्च व एप्रिल महिन्यात केंद्रांवर धानाची आवक वाढली होती.

Web Title: 13 Crore pumped out of paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.