खासगी वाहन उलटून १३ प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 10:45 PM2019-07-04T22:45:33+5:302019-07-04T22:45:50+5:30
शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे बोलेरो पिकअप वाहन उलटून ११ विद्यार्थी व इतर दोन प्रवासी जखमी झाले. ही घटना अहेरी-सिरोंचा मार्गावरील येर्रागड्डा फाट्यावरील वळणावर गुरूवारी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिमलगट्टा : शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे बोलेरो पिकअप वाहन उलटून ११ विद्यार्थी व इतर दोन प्रवासी जखमी झाले. ही घटना अहेरी-सिरोंचा मार्गावरील येर्रागड्डा फाट्यावरील वळणावर गुरूवारी घडली.
मोयाबिनपेठा परिसरातील बोगडा गुडम गावातील विद्यार्थी चामोर्शी तालुक्यातील अड्याळ येथील आश्रमशाळेत बोलेरो या प्रवासी वाहनाने आलापल्लीपर्यंत जाणार होते. तेथून ते बसने पुढचा प्रवास करणार होते. दरम्यान विरूध्द दिशेने येणाऱ्या ट्रकने कट मारला. ट्रकच्या धडकेपासून वाचविण्यासाठी बोलोरो पीकअप वाहन रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटले. यामध्ये वाहनातील ११ विद्यार्थी व इतर दोन प्रवासी जखमी झाले. यामध्ये पाच विद्यार्थी गंभीर जखमी झाले. उर्वरित सहा किरकोळ जखमी आहेत.
सर्व जखमींना सर्वप्रथम अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात भरती केले. गंभीर जखमींमध्ये पोषक्का आलाम (५५) रा.परसेवाडा, सूर्यकांत सिडाम रा. जोगनगुडा, विद्यार्थ्यांमध्ये बियश्वर बानय्या पोरतेट (१३), आकाश मधुकर पोरतेट (१५), कविता लिंगय्या आलाम (९) हे गंभीर जखमी आहेत. किरकोळ जखमींमध्ये प्रवीण आनंद आत्राम (१३), अंकित सत्यम पोरतेट (१३), मनिकंटा सुधाकर गावडे (१२), महेंद्र शामराव पोरतेट (१२), सलिमा लिंगा आलाम (१३), प्रियंका चंदू आलाम (१४), मदनक्का सोमय्या आत्राम (१४), मोनिका बकय्या कुळमेथे सर्व रा. बोगडागुडम, अशी विद्यार्थ्यांची नावे आहेत.