१३ हजार नागरिकांनी काेराेनाला हरवून दाखवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:36 AM2021-04-25T04:36:33+5:302021-04-25T04:36:33+5:30

काेट घाबरू नका, काेराेनाला आम्हीही हरविले काेराेना हाेणार नाही, याची खबरदारी प्रत्येक नागरिकाने घेणे आवश्यक आहे. तरीही काेराेनाची लागण ...

13,000 citizens defeated Kareena | १३ हजार नागरिकांनी काेराेनाला हरवून दाखवले

१३ हजार नागरिकांनी काेराेनाला हरवून दाखवले

Next

काेट

घाबरू नका, काेराेनाला आम्हीही हरविले

काेराेना हाेणार नाही, याची खबरदारी प्रत्येक नागरिकाने घेणे आवश्यक आहे. तरीही काेराेनाची लागण झाल्यास वेळीच तपासणी करून रुग्णालयात दाखल हाेणे आवश्यक आहे. लवकर उपचार सुरू झाल्यास काेराेनाचा काहीच त्रास हाेत नाही. कृत्रिम ऑक्सिजनचीही गरज पडत नाही.

-एकनाथ गेडाम, ज्येष्ठ नागरिक

काेट

समाजात काेराेनाविषयी नकारात्मक विचार पसरविले जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये या राेगाविषयी अनावश्यक भीती निर्माण झाली आहे. मी स्वत: ६१ वर्षांचा आहे. मात्र, उपचारादरम्यान मला ऑक्सिजनची गरजच भासली नाही. डाॅक्टरांनी दिलेल्या औषधांमुळे मी काेराेनातून पूर्णपणे बरा झालाे आहे.

-देवाजी चापले, ज्येष्ठ नागरिक

काेट

काेराेनामुळे सर्वच रुग्ण गंभीर राहत नाहीत. मी स्वत: घरीच राहून उपचार घेतला आहे. डाॅक्टरांच्या सल्ल्यानंतर मी उपचार घेत हाेताे. मला थाेडा सर्दी, खाेकला हाेता. काेराेनाची चाचणी केल्यावर अहवाल पाॅझिटिव्ह आला. चार दिवसांतच सर्दी, खाेकल्याचा त्रास कमी झाला.

-शिवराम मांदाडे, काेराेनामुक्त नागरिक

जिल्ह्याची लाेकसंख्या

१३,००,०००

स्वॅब तपासणाऱ्यांची संख्या- २,०२,४८८

काेराेना निगेटिव्ह आलेली संख्या- १,८४,४८४

वर्षभरात काेराेनाची लागण झालेली संख्या- १८,००४

काेराेवर मात करणाऱ्यांची संख्या- १३,३७५

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण- ४,३१८

बाॅक्स

आठ दिवसांत काेराेनामुक्त झालेले

शुक्रवार- ३१९

गुरुवार- २८३

बुधवार- ३५४

मंगळवार- १७७

साेमवार- २८७

रविवार- २६३

शनिवार- २२६

Web Title: 13,000 citizens defeated Kareena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.