१,३०३ गावांनी काेराेनाला राेखले वेशीवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:38 AM2021-04-09T04:38:53+5:302021-04-09T04:38:53+5:30
काेट आमच्या गावातील नागरिकांचा शहरी भागातील नागरिकांशी फारसा संपर्क येत नाही. ही जमेची बाजू आहे. त्यामुळे जिल्ह्यात काेराेनाचे रूग्ण ...
काेट
आमच्या गावातील नागरिकांचा शहरी भागातील नागरिकांशी फारसा संपर्क येत नाही. ही जमेची बाजू आहे. त्यामुळे जिल्ह्यात काेराेनाचे रूग्ण वाढत असताना आमच्या गावात मात्र आजपर्यंत एकही काेराेनाचा रूग्ण आढळून आला नाही. - दुधराम कुळमेथे, नागरिक
बाॅक्स
काेराेना काय असते ते शहरी भागातील नागरिकांनाच माहीत. आमच्या गावातील एका नागरिकाला या राेगाचा अनुभव आला नाही. शहरात लाॅकडाऊन असले तरी आमच्या गावात मात्र आम्ही बिनधास्त आहाेत. सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत.- शिवराम कुकुडकर, नागरिक
लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर गावातील युवकांनी दुसऱ्या गावातील नागरिकांना गावात येण्यास प्रतिबंध घातले हाेते. आता मात्र काेणतेही प्रतिबंध नाही. गावात लग्न व इतर समारंभासाठी दुसऱ्या गावातील नागरिक येतात. मात्र सुदैवाने गावातील एकालाही काेराेनाची बाधा झाली नाही. -अजित मेश्राम, नागरिक
बाॅक्स
लसीकरणामुळे दिलासा
प्राथमिक आराेग्य केंद्रांमध्ये आता लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या लसीकरण केंद्रांवर जाऊन नागरिक लस घेत आहेत. त्यामुळे ही गावे आता काेराेनापासून मुक्तच राहतील, अशी शक्यता आहे.
एकूण रूग्ण-११,६०२
काेराेनामुक्त झालेले-१०,४४२
एकूण मृत्यू-१२४
जिल्ह्यातील पहिला रूग्ण-१८ मे २०२०