‘मिसमॅच’मधील १३४८ शेतकरी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 11:09 PM2018-03-11T23:09:08+5:302018-03-11T23:09:08+5:30

राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी अर्ज केल्यानंतर आधार नंबर, बँक अकाऊंट नंबर किंवा नाव अशी कागदपत्रे जुळत नसल्याने अशा ‘मिसमॅच’ शेतकऱ्यांची कर्जमाफी वांद्यात आली होती.

1348 farmers from 'Mismatch' are eligible | ‘मिसमॅच’मधील १३४८ शेतकरी पात्र

‘मिसमॅच’मधील १३४८ शेतकरी पात्र

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा बँकेच्या कर्जदारांना दिलासा : राष्ट्रीयीकृत बँकांची पडताळणी सुरूच

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी अर्ज केल्यानंतर आधार नंबर, बँक अकाऊंट नंबर किंवा नाव अशी कागदपत्रे जुळत नसल्याने अशा ‘मिसमॅच’ शेतकऱ्यांची कर्जमाफी वांद्यात आली होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २२५९ कर्जदार शेतकऱ्यांपैकी १३४८ शेतकऱ्यांचे कागदपत्रे आता जुळली असून त्यांची नावे लवकरच ग्रीन लिस्टमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत.
जिल्हा सहकारी बँकेप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकांच्याही अनेक खातेदारांची कागदपत्रे जुळली नव्हती. मात्र त्यांची पडताळणी अद्यापही सुरूच असून किती शेतकरी पात्र ठरले याची आकडेवारी अद्याप सहकार विभागाकडे उपलब्ध झालेली नाही.
अनेक प्रकारची माहिती सरकारच्या पोर्टलवर टाकल्यानंतर त्यांची विविध टप्प्यांवर पडताळणी करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही अनेक शेतकऱ्यांची माहिती जुळत नव्हती. त्यामुळे कर्जमाफीस पात्र असूनही त्यांना प्रत्यक्षात लाभ देण्यात आला नाही. आता त्यापैकी जिल्हा बँकेच्या १३४८ कर्जदार शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र ९११ शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या लाभातून बाद करण्यात आले आहे. ३१ मार्चपर्यंत पुन्हा अर्ज करण्याची संधी दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
नव्याने अर्ज करणाऱ्यांचे वांदे
कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी विविध कारणांनी अर्ज करू न शकलेल्या शेतकऱ्यांना एक संधी म्हणून ३१ मार्चपर्यंत आॅनलाईन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी आॅनलाईन अर्ज करण्याचा प्रयत्न केला होता त्यांना वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यांनी यापूर्वी आॅनलाईन अर्ज भरताना आपला आधार नंबर टाकला होता, पण सेतू केंद्रातील थम्ब मशीनमधील बिघाडामुळे त्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले नव्हते. आता नव्याने अर्ज भरताना आधार नंबर टाकल्याबरोबर त्या नंबरवरुन आधीच अर्ज भरलेला आहे, असा संदेश येऊन त्यांचा अर्ज स्वीकारल्या जात नाही. या समस्येने त्रस्त झालेले अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: 1348 farmers from 'Mismatch' are eligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.