नागरिकांना १३७० दाखल्यांचे वाटप

By admin | Published: August 3, 2014 11:23 PM2014-08-03T23:23:19+5:302014-08-03T23:23:19+5:30

सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत भेंडाळा येथे ग्रा. पं. च्या सभागृहात समाधान शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या शिबिरात नागरिकांना १३७० दाखल्यांचे वितरण करण्यात आले.

1370 certificates distributed to citizens | नागरिकांना १३७० दाखल्यांचे वाटप

नागरिकांना १३७० दाखल्यांचे वाटप

Next

चामोर्शी : सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत भेंडाळा येथे ग्रा. पं. च्या सभागृहात समाधान शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या शिबिरात नागरिकांना १३७० दाखल्यांचे वितरण करण्यात आले. त्याबरोबरच १०० रूग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
समाधान शिबिराचे उद्घाटन सरपंच लालाजी उंदीरवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अशोक कुमरे होते. प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्य पार्वता कन्नाके, नायब तहसीलदार मंथनवार, पं. स. सदस्य प्रमोद भगत, रेवनाथ कुसराम, नुमचंद भिवनकर, सरपंच रत्नमाला गेडाम, सरपंच भगत, उपसरपंच अनिल सातपुते, पोलीस पाटील श्रीरंग म्हशाखेत्री, ग्रा. पं. सदस्य गजानन पोरेड्डीवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमात उत्पन्नाचे प्रमाणपत्र ७१, वंशावली सत्यापण २०, जातीचे दाखले ११, राशन कार्ड ५, कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे चेक २, सामाजिक अर्थसहाय्य योजना ४६, सातबारा ४३७, आठ अ १२५, नकाशे १३१, उत्पन्नाचे दाखले २५२, रहिवासी व जातीचे दाखले २७१ अशा एकूण १३७० दाखल्यांचे वितरण समाधान शिबिरात करण्यात आले.
यावेळी आरोग्य विभागामार्फत १०० रूग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच जीवनदायी योजनेची माहिती नागरिकांना देण्यात आली. पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांना दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, वराहपालन, वैरण विकास, मुरघास तयार करणे, चारा कटाई यंत्र, असोल लागवड, पोल्ट्री फार्म, मांसलपक्षी आदी संबंधी व्यवसायाच्या योजनेविषयी नागरिकांना माहिती देण्यात आली. कृषी विभागामार्फत पीक विमा योजना, श्री पद्धत लागवड, भातावरील कीड, कंपोस्ट खत, गांडूळ खत, बालविकास योजनेंतर्गत ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना सकस आहार देण्याविषयी माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन नायब तहसीलदार दहिकर यांनी केले. प्रास्ताविक मंडळ अधिकारी एम. एम. सरजारे यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी एन. एस. अतकारे, डी. एस. शेडमाके, के. ए. चाटे, जयश्री कुळमेथे, अर्चना गंग्रस, कोटवार, माणिक कोडाप, रवी आत्राम, मधुकर बोदलकर, मोरेश्वर साखरे, रेवनाथ मेश्राम यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 1370 certificates distributed to citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.