गडचिरोलीच्या जंगलात आढळले १३८ जिवंत काडतूस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 06:38 PM2018-04-20T18:38:40+5:302018-04-20T18:38:40+5:30
आलापल्ली ते सिरोंचा या मुख्य मार्गावर आलापल्लीपासून 12 किमी अंतरावर असलेल्या मोसम गावाजवळच्या जंगल परिसरात लपवून ठेवलेला काडतुसांचा साठा नक्षलविरोधी अभियान पथकाने जप्त केला आहे.
आलापल्ली (गडचिरोली) - आलापल्ली ते सिरोंचा या मुख्य मार्गावर आलापल्लीपासून 12 किमी अंतरावर असलेल्या मोसम गावाजवळच्या जंगल परिसरात लपवून ठेवलेला काडतुसांचा साठा नक्षलविरोधी अभियान पथकाने जप्त केला आहे. घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी हे काडतुस लपवून ठेवले होते अशी माहिती पोलिसांकडून मिळाली. काडतुसांचा हा साठा पोलिसांनी ताब्यात घेतल्याने नक्षल्यांचा मोठा घातपात घडविण्याचा डाव उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
आलापल्ली सिरोंचा मार्गावरील मोसम येथे बॉम्बशोधक पथक शोधमोहीम राबवित असताना झुडुपात वायर दिसले. त्यामुळे सावध होऊन पथकाने शोध घेतला असता तब्बल १३८ जीवंत काडतुसे आढळून आली. अत्याधुनिक बंदुकीत वापरली जाणारी ही काडतुसे तसेच वायर आणि इतर साहित्य कापडात गुंडाळून लपवुन ठेवलेले होते.