वाको येथे १४ जोडपी विवाहबद्ध
By admin | Published: May 3, 2017 01:45 AM2017-05-03T01:45:20+5:302017-05-03T01:45:20+5:30
आदिवासी कंवर समाज क्षेत्र कोटगूलच्या वतीने वाको येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन सोमवारी करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी केले मार्गदर्शन : आदिवासी कंवर समाजाचा उपक्रम
कोरची : आदिवासी कंवर समाज क्षेत्र कोटगूलच्या वतीने वाको येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन सोमवारी करण्यात आले. या मेळाव्यात सुमारे १४ जोडपी विवाहबद्ध झाली.
या मेळाव्याचे उद्घाटन आदिवासी कंवर समाज महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. मेघराज कपूर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सुखीराम कंवर होते. प्रमुख अतिथी म्हणून पं. स. उपसभापती श्रावण मातलाम, कोटगूलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरीश टेकाम, बिंदूराम चंद्रवंशी, हरीराम पुजेरी, हरीशचंद्र पैकरा, रामदास हारामी, गोविंद टेकाम, डॉ. चमरू दुधकंवर, धरमदास उईके, गुलाब सोनकुकरा, अगरसिंग खडाधार, सुनेर सोनटापर, मदनसिंह करसी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. मेघराज कपूर म्हणाले, कोणत्याही समाजाचा विकास व समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील, तर ज्या समाजातील सक्षम नेतृत्व उभे राहणे आवश्यक आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव या नेतृत्वाला असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले.
कंवर समाजाच्या वतीने नान्ही येथे ४२, पिंडकेपार येथे ३६, कोरची येथे २२ व वाको येथे १४ जोडपी असे एकूण ११४ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. गोविंद टेकाम यांनी शिक्षण व आरोग्यावर मार्गदर्शन केले. पेसा कायदा व त्यातून होणारा सामाजिक विकास यावर प्रकाश टाकला. सुखीराम कंवर यांनी सामूहिक विवाह सोहळ्याचे महत्त्व पटवून दिले. विवाह सोहळ्यावरील अनावश्यक खर्च टाळण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध व्हावे, असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्षेत्रीय अध्यक्ष लगुन कार्यपाल, गेंदलाल सोनकलस, चिंताराम सापा, भगतराम कार्यपाल, अर्जून सोनकलस, आनंद भेसरा, मिराबाई दुधकंवर, रमितबाई करसी, लिल्हार फुल्लारे, रैनसिंग साहाळा, तुकाराम कपुरडेरिया, नारद फुल्लारे यांच्यासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या समाजोपयोगी कार्यक्रमांचे मान्यवरांनी कौतुक केले. (तालुका प्रतिनिधी)