१४ शेतकरी गटांना यंत्रसहाय्य
By admin | Published: February 29, 2016 12:57 AM2016-02-29T00:57:15+5:302016-02-29T00:57:15+5:30
शेतीत यंत्राचा अधिकाधिक वापर करून उत्पादन वाढविण्यासाठी तसेच टंचाईच्या मनुष्यबळावर मात करण्यासाठी ...
२०१४-१५ वर्षात वितरण : पॉवर टिलर, धान रोवणी, कोनोविडर, मळणी संच
गडचिरोली : शेतीत यंत्राचा अधिकाधिक वापर करून उत्पादन वाढविण्यासाठी तसेच टंचाईच्या मनुष्यबळावर मात करण्यासाठी मानव विकास मिशन योजना, जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना, कृषी प्रक्रिया योजना, विशेष सहाय्य योजनेंतर्गत गडचिरोली पंचायत समितीच्या वतीने २०१४-१५ या वर्षात ९० टक्के अनुदानावर एकूण १४ शेतकरी गटांना यंत्र संचाचे वाटप करण्यात आले.
गडचिरोली पंचायत समितीच्या वतीने मानव विकास मिशन अंतर्गत कृषी यांत्रिकी योजनेंतर्गत एक पॉवर टिलर, एक भात रोवणी यंत्र, १० कोनोविडर, एक भात कापणी यंत्र, मळणी यंत्र सहा शेतकरी गटांना वितरित करण्यात आले.
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत एक पॉवर टिलर, भात रोवणी यंत्र, १० कोनोविडर, एक मळणी यंत्र दोन शेतकरी गटांना, कृषी प्रक्रिया योजनेंतर्गत आटाचक्की, मिरची कांडक यंत्र, तेलघाणी, वजन काटा तीन शेतकरी गटांना वितरित करण्यात आले. तसेच विशेष सहाय्या योजनेंतर्गत दालमिल, स्पायरल, सेप्रेटर, धान्य कोटी व इतर साहित्य तीन शेतकरी गटांना वितरित करण्यात आले. २०१४-१५ या वर्षात एकूण १४ शेतकरी गटांना यंत्र सहाय्य करण्यात आले. याशिवाय २०१५-१६ विशेष घटक योजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजना योजनेंतर्गत शेतकरी गटांना लाभ दिला जाणार आहे. याकरिता मंजुरीही प्राप्त झाली आहे.
शेतकऱ्यांना वितरित केल्या जाणाऱ्या यंत्रांची किंमत बाजारात ९ लाख ५६ हजार ३०२ रूपयांच्या आसपास आहे. परंतु शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर लाभ दिला जात आहे. शेतकरी गटांना केवळ ८२ हजार ८१२ रूपये याकरिता जमा करावे लागतात. (शहर प्रतिनिधी)