काळी-पिवळी उलटून १४ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:51 PM2019-01-29T23:51:45+5:302019-01-29T23:52:16+5:30

तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी जात असलेल्या कुरूळ येथील प्रवाशांचे काळी-पिवळी वाहन उलटल्याने १४ मजूर जखमी झाले. सदर घटना चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील चामोर्शीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या पेट्रोलपंपाजवळ मंगळवारी रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान घडली.

14 injured in black and yellow | काळी-पिवळी उलटून १४ जखमी

काळी-पिवळी उलटून १४ जखमी

Next
ठळक मुद्देचामोर्शीजवळ अपघात : मिरची तोडाईसाठी तेलंगणात जात होते मजूर

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी जात असलेल्या कुरूळ येथील प्रवाशांचे काळी-पिवळी वाहन उलटल्याने १४ मजूर जखमी झाले. सदर घटना चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील चामोर्शीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या पेट्रोलपंपाजवळ मंगळवारी रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान घडली.
चामोर्शी तालुक्यातील कुरूळ येथील मजूर मिरची तोडण्यासाठी एमएच ३४ डी २३२९ या क्रमांकाच्या काळी-पिवळी वाहनाने मूल मार्गे तेलंगणा राज्यात जात होते. दरम्यान चामोर्शीजवळच्या पेट्रोलपंपाजवळ काळी-पिवळी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे काळी-पिवळी वाहनाने समोरून येणाऱ्या एमएच ३३ व्ही २५४७ क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या रिकाम्या ट्रॉलीला धडक दिली. धडक एवढी जबर होती की, या धडकेने ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. तसेच काळी-पिवळी वाहन सुध्दा रस्त्यावरच उलटले.
या अपघातात काळीपिवळीत बसलेले शालिक परचाके (४५), मिराबाई मडावी (६५), पुष्पा परचाके (६५), सविता आगेवार (२५), नंदना मडावी (१३), देविदास आगेवार (३०), उज्वल मडावी (५), विद्या कुळमेथे (४०), निलकंठ कुळमेथे (४५), अनंता गेडाम (६५), कैलास मडावी (३८), हरीदास मडावी (२६), अल्का मडावी (३५), सुचिता मडावी (२४) सर्व रा. कुरूळ हे जखमी झाले आहेत. अपघात झाल्याची माहिती कळताच चामोर्शीचे ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना चामोर्शी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
काळी-पिवळी रस्त्यावरच उलटली असल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र पोलिसांनी वाहन बाजुला करून मार्ग मोकळा केला.
 

Web Title: 14 injured in black and yellow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात