दरदिवशी १४ टन कचऱ्याची पडते भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:45 AM2020-12-30T04:45:05+5:302020-12-30T04:45:05+5:30
गडचिराेली : आधुनिक जीवनशैलीचा स्वीकार केला जात असल्याने दिवसेंदिवस कचऱ्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. गडचिराेली शहरातून दरदिवशी सरासरी १४ ...
गडचिराेली : आधुनिक जीवनशैलीचा स्वीकार केला जात असल्याने दिवसेंदिवस कचऱ्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. गडचिराेली शहरातून दरदिवशी सरासरी १४ टन कचऱ्याची उचल केली जाते. यातील काही कचरा अतिशय घातक असल्याने या कचऱ्याचे भविष्यात दुष्परिणाम हाेण्याची शक्यता आहे.
शहरातील एकूण कचऱ्याच्या प्रमाणात प्लास्टिकचे प्रमाण ५० टक्केपेक्षा अधिक राहते. प्लास्टिक शेकडाे वर्ष कुजत नाही. त्यामुळे प्लास्टिकच्या बॅगवर शासनाने बंदी घातली आहे. तरीही प्लास्टिकचा वापर सुरू आहे. तसेच अनेक खाद्य पदार्थ व इतर वस्तू सुध्दा प्लास्टिकने पॅकींग केल्या जातात. विशेष म्हणजे, ओला व सुखा कचऱ्याचे वर्गीकरण घरीच हाेणे आवश्यक असले तरी महिला वर्ग कचऱ्याचे वर्गीकरण करीत नाही. त्यामुळे हा कचरा पुढे जसाचा तसा डम्पिंग यार्डवर नेला जाते.
बाॅक्स
कचऱ्याचे वर्गीकरण करणे कठीण
ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खताची निर्मिती केली जाते. तर सुखा कचरा दुसऱ्या ठिकाणी टाकल्या जाते. ओला व सुखा कचऱ्याचे घरीच वर्गीकरण हाेणे आवश्यक आहे. याबाबत नगर परिषदेने अनेक वेळा जागृती केली आहे. मात्र नागरिक ओला व सुखा कचरा एकाच ठिाकणी टाकतात. पुढे या कचऱ्याचे डम्पिंग यार्डवर वर्गीकरण करणे कठीण हाेते. सुख्या कचऱ्यामध्ये अनेक वस्तूंचा समावेश राहत असल्याने त्याचे सुध्दा वर्गीकरण करणे अपेक्षित आहे. मात्र संपूर्ण कचऱ्याचे वर्गीकरण करणे शक्य हाेत नाही. कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा नगरपरिषदेकडे उपलब्ध नाही.
शहरातून कचरापेट्या हद्दपार
वर्षभरापूर्वी गडचिराेली नगर परिषदेकडे ऑटाे टिपर नव्हत्या. त्यावेळी केवळ घंटागाड्यांच्या माध्यमातून कचऱ्याचे संकलन केले जात हाेते. हा कचरा जवळपासच्या कचरापेटीमध्ये टाकला जात हाेता. काही कचरा बाहेर पडत असल्याने कचरापेटीच्या सभाेवताल कचरा राहत हाेता. तसेच दुर्गंधही येत हाेती. आता ऑटाेटिपरमुळे मात्र गाेळा केलेला कचरा थेट डम्पिंग यार्डवर नेला जाते.
वॉच ठेवण्यासाठी जीपीएस यंत्रणा
- गडचिराेली शहरात एकूण १० ऑटाे टिपर आहेत. या सर्वच ऑटाे टिपरला जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे ऑटाे नेमका कुठे आहे, याची माहिती नगर परिषदेला मिळते.
- ऑटाे टिपरसाेबतच १५ घंटागाड्यांच्या माध्यमातून कचऱ्याचे संकलन केले जाते. घंटागाड्यांमधून गाेळा केलेला कचरा ऑटाे टिपरमध्ये टाकला जाते. पुढे हा कचरा डम्पिंग यार्डवर नेला जाते.