दारूच्या वाहनासह १.४० लाखांचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:25 AM2021-07-10T04:25:36+5:302021-07-10T04:25:36+5:30
देसाईगंज येथे अवैध दारूविक्रीचे प्रमाण वाढत असतानाच अवैध दारूविक्रेत्यांवर पाेलिसांकडून कारवाईसुद्धा केली जात आहे. पाेलिसांचे धाडसत्र सुरू असले तरी ...
देसाईगंज येथे अवैध दारूविक्रीचे प्रमाण वाढत असतानाच अवैध दारूविक्रेत्यांवर पाेलिसांकडून कारवाईसुद्धा केली जात आहे. पाेलिसांचे धाडसत्र सुरू असले तरी काहीजण छुप्या पद्धतीने दारूची विक्री करीत आहेत. देसाईगंज येथे अवैधरित्या दारूची वाहतूक हाेत असल्याची माहिती पाेलीस व स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता सापळा रचून माल पकडण्यात आला. यामध्ये ईम्पिरीअल ब्ल्यू व्हिस्की कंपनीच्या ४० बाटल्या, प्रत्येक बाॅटल ५०० रुपयांप्रमाणे २० हजार रुपये, राॅयल स्टॅग कंपनीच्या ४० बाटल्या प्रत्येक बाॅटल ५०० रुपये प्रमाणे २० हजारांचा माल तसेच एम.एच.३३/एए ५९३१ क्रमांकाची दुचाकी पकडण्यात आली.
या दुचाकीची किंमत जवळपास १ लाख रुपये आहे. असा एकूण एकूण १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी निखिल संतोष बोटकावार (२०) रा.पारडी, ता. गडचिरोली याला अटक करण्यात आली. पाेलीस निरीक्षक डाॅ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई होत आहे.
090721\img-20210709-wa0021.jpg
सततच्या कारवाईने अवैध दारुविक्रेते हैराण