१५ दिवसात एकही विद्यार्थी काेराेनाबाधित आढळला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:34 AM2021-08-01T04:34:01+5:302021-08-01T04:34:01+5:30
गडचिराेली : शासनाच्या निर्देशानुसार गडचिराेली जिल्ह्यातील काेराेनामुक्त गावातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष भरविले जात आहेत. १५ जुलैपासून ...
गडचिराेली : शासनाच्या निर्देशानुसार गडचिराेली जिल्ह्यातील काेराेनामुक्त गावातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष भरविले जात आहेत. १५ जुलैपासून हे वर्ग भरविले जात असून या वर्गाच्या जिल्हाभरातील एकूण १९४ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. १५ दिवसात या शाळांमधील एकही विद्यार्थी काेराेनाबाधित आढळला नाही. तसेच काेणतीही शाळा बंद करावी लागली नसल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.
काेट...
विद्यार्थी मजेत, पालक समाधानी
शाळा पुन्हा सुरू झाल्याने आम्हाला प्रत्यक्ष अध्ययनाची संधी मिळाली आहे. शाळेत काेराेना संसर्गासंबंधात आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे काेराेना संसर्गाची फारशी भीती नसून नियमित शाळेत जाणे आम्हाला आवडत आहे.
- प्रतीक मडावी, विद्यार्थी
........
गेल्या दीड वर्षानंतर पहिल्यांदा आमचे विद्यालय सुरू झाले. त्यामुळे माेठा आनंद झाला. वर्गातील मित्रांसाेबत प्रत्यक्ष वर्गात बसून शिकायला मिळत आहे. नेटवर्कअभावी अडचणी येणाऱ्या ऑनलाईन अध्ययनातून आमची सुटका झाली आहे. काेराेनाबाबत शाळेत आवश्यक काळजी घेतली जात आहे.
- मनाेज उंदीरवाडे, विद्यार्थी
...............
गेल्या एक ते दीड वर्षानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. ही बाब चांगली आहे. परंतु काेराेना संसर्ग अद्यापही पूर्ण संपलेला नाही. शाळेच्यावतीने उचित काळजी घेतली जात असल्याने आम्हाला फारशी चिंता नाही.
- मनाेहर हिचामी, पालक
..................
जिल्ह्यात एकूण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा - २५५
सध्या सुरू असलेल्या शाळा - १९४
काेट...
१५ जुलैपासून काेविडमुक्त भागातील १९४ शाळांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यात आले आहे. शाळा सुरू झाल्यापासून एकाही शाळेमध्ये काेराेनाबाधित विद्यार्थी तसेच शिक्षक आढळून आला नाही. परिणामी काेराेना संसर्गामुळे एकही शाळा बंद करण्याची पाळी आली नाही. धानपीक राेवणीच्या कामामुळे विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण कमी आहे. १५ दिवसानंतर विद्यार्थी उपस्थिती निश्चितच वाढणार आहे.
- आर.पी.निकम, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जि.प.गडचिराेली
बाॅक्स...
विद्यार्थी उपस्थिती ४० टक्क्यांवर
शासनाच्या निर्देशानुसार गडचिराेली जिल्ह्यातील १९४ माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी शेतीचे काम सहज करतात. आईवडिलांना मदत करण्यासाठी धानपीक राेवणीच्या कामासाठी अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी जात आहेत. त्यामुळे शाळांमधील विद्यार्थी उपस्थिती कमी झाली आहे. सुरू झालेल्या शाळांमध्ये जिल्ह्यात विद्यार्थी उपस्थिती सध्या ४० टक्क्यांवर पाेहाेचली आहे.