निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १५ लाखांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 06:00 AM2019-10-17T06:00:00+5:302019-10-17T06:00:34+5:30

दोन चारचाकी व दुचाकी वाहनांची तपासणी केली असता, त्यामध्ये दारू आढळून आली. वाहनचालक वाहने सोडून फरार झाले. या प्रकरणी कुख्यात दारू तस्कर निर्मल धमगाये, तरूण धमगाये दोघेही रा.कोरची, सुजीत बिश्वास रा.येडापूर, नीरज राधवानी रा.येंगलखेडा, जयदेव गहाणे रा.पुराडा यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पुराडा पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार सुखदेव गोदे करीत आहेत.

15 lakh alcohol seized in the wake of the election | निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १५ लाखांची दारू जप्त

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १५ लाखांची दारू जप्त

Next
ठळक मुद्देएलसीबीची कारवाई : तस्कर निर्मलवर आणखी एक गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/कुरखेडा : निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जसजसी जवळ येत आहे तसतशी नाकेबंदी अजून कडक केली जात आहे. बुधवारी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुराडा पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या रामगड-भटेगाव मार्गावर सापळा रचून दोन चारचाकी वाहनांमधून आणि एका दुचाकीवरून येणारी १५ लाख रुपयांची दारू आणि ११ लाखांची वाहने तसेच मोबाईल जप्त केले.
रामगडवरून अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती कुरखेडा पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. दोन चारचाकी व दुचाकी वाहनांची तपासणी केली असता, त्यामध्ये दारू आढळून आली. वाहनचालक वाहने सोडून फरार झाले. या प्रकरणी कुख्यात दारू तस्कर निर्मल धमगाये, तरूण धमगाये दोघेही रा.कोरची, सुजीत बिश्वास रा.येडापूर, नीरज राधवानी रा.येंगलखेडा, जयदेव गहाणे रा.पुराडा यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पुराडा पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार सुखदेव गोदे करीत आहेत.कोरचीतील दारू तस्कर निर्मल धमगाये याच्यावर दारूबंदी कायद्याचे अनेक दाखल झाले आहेत. परंतू तरीही त्याचा व्यवसाय थांबलेला नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, कोरची, कुरखेडा भागात त्याचे जाळे पसरले आहे.

गट्ट्यात भूसुरूंग स्फोट?
निवडणुकीच्या कामात अडथळे आणण्यासाठी नक्षलवाद्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गत बुधवारी एटापल्लीपासून ३६ किलोमीटर अंतरावर असलेल्या गट्टा येथील चर्चजवळ सकाळी भूसुरुंग स्फोट झाल्याचे वृत्त आहे. त्यात कोणी जखमी झाले नसले तरी गट्टा पोलीस मदत केंद्रापासून अर्धा किमी अंतरावर हा स्फोट घडल्याची चर्चा एटापल्लीत सुरू होती. मात्र पोलिसांकडून त्या घटनेला दुजोरा मिळाला नाही. दुसऱ्या एका घटनेत कसनसूर पोलीस स्टेशनअंतर्गत छत्तीसगड सीमेवरील बिजाबंडी गावाजवळ रस्त्याचे काम सुरू असताना एक जेसीबी वाहन जाळण्यात आले. ते छत्तीसगडधील कंत्राटदाराचे असल्याचे समजते.

आज जनजागृती रॅली
मतदार जनजागृतीसाठी स्वीप कार्यक्र मांतर्गत निवडणूक विभागामार्फत गडचिरोली जिल्हा मुख्यालयी गुरूवार दि.१७ रोजी सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रॅली जिल्हा क्रीडांगण, पोटेगाव रोड येथून सुरू होईल. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, विविध वयोगटातील मतदार, जेष्ठ नागरिक यांचा सहभाग राहणार आहेत. दिव्यांग मतदारांसाठी आॅटोरिक्षाची सोय करण्यात आलेली आहे. दुचाकी व सायकल रॅली यांचा सुद्धा सदर रॅलीमध्ये सहभाग राहील. दरम्यान जिल्हा क्र ीडांगण, येथे सकाळी ७.३० वाजता रांगोळी व चित्रकला स्पर्धा होणार आहे.

Web Title: 15 lakh alcohol seized in the wake of the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.