१५ हजार शेतकऱ्यांनी दिली कृषी महोत्सवाला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 09:37 PM2018-12-25T21:37:19+5:302018-12-25T21:37:35+5:30
२१ ते २५ डिसेंबर या कालावधीत गडचिरोली येथे अशी गोंडवन महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाला जिल्हाभरातील १५ हजार ३५८ शेतकऱ्यांनी भेट देऊन विविध स्टॉलच्या माध्यमातून शेती विषयची माहिती जाणून घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत गडचिरोली येथे अशी गोंडवन महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाला जिल्हाभरातील १५ हजार ३५८ शेतकऱ्यांनी भेट देऊन विविध स्टॉलच्या माध्यमातून शेती विषयची माहिती जाणून घेतली.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, जि.प. कृषी सभापती कोंदडधारी नाकाडे, नगराध्यक्ष योगीता पिपरे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, नगरसेवक प्रमोद पिपरे, रेखा डोळस, शमा अली, प्रमिला कतलानी, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, डीआरडीएचे प्रकल्प संचालक कुणाल उंदीरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वंजारी, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप कºहाळे, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त प्र. जू. वैद्य, चेतना लाटकर, उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर आदी मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवात ७५ लाख ६२ हजार रूपयांच्या साहित्याची विक्री झाली. यामध्ये चार ट्रॅक्टर, थ्रेशर व रोटावेटर यांचा समावेश आहे.
शेतकºयांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. सुमारे १ हजार २२२ शेतकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात आले. १७६ शेतकºयांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. मंगळवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड, सहायक जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, मुख्याध्यापक डॉ. संजय भांडारकर यांनी मार्गदर्शन केले. प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, डीआरडीएचे कुणाल उंदीरवाडे यांनीही स्वत:चे अनुभव कथन केले. यशस्वीतेसाठी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयंत टेंभुर्णे, सहायक अधीक्षक डी. जी. गेडाम, संगणक आज्ञावली रूपरेखक, बी. पी. गायकवाड, श्रीकांत कापगते, आशिष बन्सोड यांनी सहकार्य केले. यावेळी मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते यांनी सदर महोत्सव शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरला, असे गौरवोद्गार काढले. आत्माच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिस, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.