पेसा चर्चासत्रात १५० गावांचा सहभाग
By admin | Published: December 26, 2016 01:35 AM2016-12-26T01:35:49+5:302016-12-26T01:35:49+5:30
तालुक्यातील मोहगाव येथे २४ डिसेंबर रोजी पेसा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पेसावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
मोहगाव येथे कार्यक्रम : वनहक्काच्या अंमलबजावणीवर मंथन
धानोरा : तालुक्यातील मोहगाव येथे २४ डिसेंबर रोजी पेसा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पेसावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मोहगाव परिसरातील सुमारे १५० ग्रामसभा सहभागी झाल्या होत्या.
पेसा दिनानिमित्त मोहगाव येथे चर्चासत्र व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात १६ इलक्यांचे लालू आतला, झुरू गावळे, सुनिल पवार, मैनू धुर्वे, विजय लाप्तलीकर, रामजी गुम्मा, हरिदास पदा, तानसिंग कुमोटी, राजश्री लेकामी, जयश्री वेळदा, लिलाबाई आतला, लोमेश सोटी, सुनिल कुमरे, बावसू पावे, रामदास जराते, महेश राऊत आदी उपस्थित होते. या महोत्सवात १५० ग्रामसभांमधील नागरिक सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने पेसा व वनहक्क कायद्यानुसार मिळालेल्या हक्काची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. मागील वर्षी तेंदूपत्ता व बांबू विक्री प्रक्रियेदरम्यान आलेल्या अडचणींवर चर्चा करून यावर्षी कोणत्याही अडत्या व दलाला हाताशी न धरता स्थानिक पातळीवरच ई-लिलाव राबविण्याचे ठरविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)