जिल्हा परिषदेतील १६ कर्मचारी पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:42 AM2021-03-01T04:42:59+5:302021-03-01T04:42:59+5:30
एकूण बाधितांची संख्या नऊ हजार ५६८ एवढी झाली आहे. त्यापैकी नऊ हजार ३४४ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या ...
एकूण बाधितांची संख्या नऊ हजार ५६८ एवढी झाली आहे. त्यापैकी नऊ हजार ३४४ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या ११८ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. एकूण १०६ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. रुग्ण बरे
होण्याचे प्रमाण ९७.६६ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण १.२३ टक्के तर मृत्युदर १.११ टक्के झाला.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील साईनगर १, नवेगाव कॉम्प्लेक्स २, कोटगल रोड ५, सीआरपीएफ
जवान १, गोकुलनगर ३, पी डब्ल्यू कॉलनी १, जिल्हा परिषद कार्यालय १६, स्थानिक १, जेल क्वार्टर १, अहेरी तालुक्यातील
सीआरपीएफ जवान १, कुरखेडा तालुक्यातील स्थानिक १ यांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेत विविध कामांसाठी ग्रामीण भागातील नागरिक येतात. जिल्हा परिषदेतच १६ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आल्याने या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांनाही काेराेनाची लागण हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेष म्हणजे मागील तीन दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. शनिवारी काेराेना रुग्णांची संख्या १०० च्या उंबरठ्यावर हाेती. ती आता ११८ एवढी झाली आहे. काेराेना रुग्णांच्या संख्येत हाेत असलेली वाढ लक्षात घेतली, तर पुन्हा पूर्वीसारखीच स्थिती हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.