१६४ ग्रा. पं. ची १00 टक्के करवसुली
By admin | Published: May 29, 2014 02:17 AM2014-05-29T02:17:39+5:302014-05-29T02:17:39+5:30
जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी १00 टक्के करवसुली करून जिल्हा परिषद प्रशासन व शासनास सहाकार्य करावे, असे राज्याच्या ग्रामीण विकास विभागाचे धोरण आहे.
गडचिरोली : जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी १00 टक्के करवसुली करून जिल्हा परिषद प्रशासन व शासनास सहाकार्य करावे, असे राज्याच्या ग्रामीण विकास विभागाचे धोरण आहे. या धोरणाची परिपूर्ण अंमलबजावणी करीत जिल्ह्यातील तब्बल १६४ ग्रामपंचायतींनी सन २0१३-१४ या वर्षात १00 टक्के करवसुली केली आहे. यामुळे या ग्रामपंचायती जिल्हा परिषद प्रशासनाच्या कौतुकास पात्र झाल्या आहेत.ग्रापच्यावतीने दरवर्षी विशेष मोहीम राबवून गृहकर व पाणीपट्टी कराची वसुली केल्या जाते. यासाठी ग्रा. पं. प्रशासनाच्यावतीने जनजागृती केली जाते. जागृत नागरिक नियमित व वेळेत कराचा भरणा करतात. मात्र बहुतांश नागरिक कराचा भरणा करीत नाही. परिणामी ग्रामपंचायतीची करापोटी लाखो रूपयाची थकबाकी असते. कराच्या थकबाकीमुळे ग्रा. पं. प्रशासनाला विकास कामे करण्यास अडचण येते. १00 टक्के करवसुली करणार्या ग्रामपंचायतीला शासनाकडून विविध योजनेंतर्गत भरघोस निधी मिळतो. यातून गावात विकासात्मक कामेही मार्गी लावण्यास मदत होते. सन २0१३-१४ या आर्थिक वर्षात १00 टक्के करवसुली करणार्या ग्रामपंचायतीमध्ये गडचिरोली तालुक्यातील ७, आरमोरी तालुक्यातील ५, देसाईगंज १, कुरखेडा ७, कोरची २२, धानोरा २६, चामोर्शी ६, मुलचेरा १३, एटापल्ली २0, अहेरी १0, भामरागड तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. अतिदुर्गम सिरोंचा तालुक्यातील सर्वाधिक ३४ ग्रामपंचायतीने गृह व पाणीपट्टी कराची १00 टक्के वसुली केली आहे. जिल्हाभरात करवसुलीमध्ये सिरोंचा पंचायत समिती आघाडीवर असल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)