१६६ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:38 PM2018-01-01T23:38:11+5:302018-01-01T23:39:25+5:30

महसूल विभागाने २०१७-१८ या वर्षातील खरीप हंगामाची अतिम पैसेवारी जाहीर केली असून एकूण १ हजार ६८८ गावांपैकी १६६ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे.

166 villages are less than 50 paise | १६६ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी

१६६ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी

Next
ठळक मुद्दे१४७९ गावांची तपासणी : धानोरा, चामोर्शी, कुरखेडा, अहेरी, एटापल्ली, भामरागड तालुक्यात स्थिती चांगली?

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : महसूल विभागाने २०१७-१८ या वर्षातील खरीप हंगामाची अतिम पैसेवारी जाहीर केली असून एकूण १ हजार ६८८ गावांपैकी १६६ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. या गावांना दुष्काळग्रस्त घोषीत करून शासनाच्या नियमानुसार सोयीसुविधा पुरविल्या जाणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील एकूण खरीप क्षेत्राच्या सुमारे ८० टक्के क्षेत्रावर धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. धान पिकाला मोठ्या प्रमाणात सिंचनाची गरज भासते. पावसाळ्याच्या सुरूवातीला पाऊस पडला. शेतकºयांनी धानाची पºहे टाकली. त्यानंतर मात्र पावसाने १५ ते २० दिवस उसंत घेतली. या कालावधीत कडक ऊन पडत असल्याने काही शेतकºयांचे धानाचे पºहे सुकले. त्यानंतर आलेल्या पावसामुळे काही शेतकºयांनी धान पिकाची रोवणी केली. त्यानंतरही पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नाही. परिणामी सिंचनाअभावी धानपीक करपले.
धानाचे पीक गर्भात असतानाच बहुतांश तालुक्यामध्ये मावा, तुडतुडा रोगाने धानपीक उद्ध्वस्त केले. काही शेतकऱ्यांनी तर धानपीक कापले सुध्दा नाही. त्यांचा उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. ज्यांचे धानपीक रोग कोरड्या दुष्काळाच्या चपाट्यातून बाहेर निघले. त्यांनाही पूर्ण उत्पादन झाले नाही. बहुतांश शेतकºयांना ५० टक्केच उत्पादन झाले आहे.
महसूल व कृषी विभागाने केलेल्या पाहणीनंतर पैसेवारी जाहीर केली जाते. जिल्ह्यात एकूण १ हजार ६८८ गावे आहेत. त्यापैकी १ हजार ५३९ गावांमध्ये खरीपाचे उत्पादन घेतले जाते. ६० गावांमध्ये खरीपाचे उत्पादनच घेतले जात नाही. यावर्षीच्या खरीप हंगामात सुमारे १ लाख ७२ हजार ५०९ हेक्टरवर खरीप पिकांची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी १६६ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. तर १ हजार ३१३ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा अधिक असल्याचे जाहीर केले आहे.
उत्पादन ५० टक्केपेक्षा कमी असतानाही पैसेवारी अधिक
कमी पावसामुळे पडलेला दुष्काळ त्यानंतर तुडतुडा व मावा रोगाने धानपिकावर केलेले आक्रमण यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना ५० टक्केपेक्षा उत्पादन कमी झाले आहे. मावा व तुडतुडा रोगाच्या प्रकोपाने धान करपल्याने काही शेतकऱ्यांनी धानपीक कापला सुध्दा नाही. अशाही परिस्थितीत सुमारे १ हजार ३१३ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा अधिक असल्याचे घोषीत करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. महसूल व कृषी विभागाचे अधिकारी कार्यालयात बसूनच कागदी घोडे नाचवत असल्याने प्रत्यक्ष नुकसान त्यांच्या लक्षात येत नाही. परिणामी पीक परिस्थिती चांगली असल्याचा अहवाल सादर करण्यात आला असल्याचे दिसून येते.
देसाईगंज, आरमोरी तालुक्यातील पूर्ण गावांना लाभ
महसूल विभागाने जाहीर केलेल्या अंतिम पैसेवारीत देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील पूर्ण गावांची पैसेवारी ५० टक्केपेक्षा कमी दर्शविण्यात आली आहे. देसाईगंज तालुक्यात एकूण ३८ गावे आहेत. या संपूर्ण गावांची पैसेवारी ४७ पैसे आहे. आरमोरी तालुक्यातील संपूर्ण ९७ गावांची पैसेवारी ४६ पैसे दाखविण्यात आली आहे. उर्वरित गडचिरोली तालुक्यातील नऊ गावे, मुलचेरा तालुक्यातील १०, कोरची तालुक्यातील १० व सिरोंचा तालुक्यातील फक्त दोन गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी दर्शविण्यात आली आहे.
दुष्काळग्रस्त गावांना मिळणाऱ्या सुविधा
ज्या १६६ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. अशा गावांना दुष्काळग्रस्त घोषीत केले जाणार आहे. या गावांमधील शेतकऱ्यांना कोरडवाहूसाठी प्रती हेक्टर ६ हजार ८०० रूपये व बागायती शेतीसाठी १३ हजार ५०० रूपये मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर या गावांमधील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात, वीज बिलात ३३ टक्के सूट, जमीन महसूलात सवलत दिली जाणार आहे. इतर गावे मात्र या लाभापासून वंचित राहणार आहेत.

Web Title: 166 villages are less than 50 paise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.