१६७ गावातील विद्यार्थ्यांना मिळणार शुल्कमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 01:02 AM2018-04-11T01:02:39+5:302018-04-11T01:02:39+5:30

प्रशासनाने जिल्ह्यातील १६७ गावे टंचाईग्रस्त घोषीत केली आहेत. या गावांमधील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ दिला जाणार आहे.

167 students of the village will get the fee | १६७ गावातील विद्यार्थ्यांना मिळणार शुल्कमाफी

१६७ गावातील विद्यार्थ्यांना मिळणार शुल्कमाफी

Next
ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचे मुख्याध्यापकांना निर्देश : टंचाईग्रस्त गावातील पालकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रशासनाने जिल्ह्यातील १६७ गावे टंचाईग्रस्त घोषीत केली आहेत. या गावांमधील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ दिला जाणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांचे प्रस्ताव २० एप्रिलपर्यंत सादर करावेत, असे निर्देश संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.
२०१७-१८ च्या खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस पडला. त्यामुळे बहुतांश गावांमधील शेतकऱ्यांचे धानाचे पीक करपले. शासनाने २८ फेब्रुवारी २०१८ रोजी गडचिरोली, मुलचेरा, देसाईगंज, आरमोरी, कोरची व सिरोंचा तालुक्यातील १६७ गावे टंचाईग्रस्त घोषीत केले आहेत. शासनाच्या नियमानुसार मार्च २०१८ मध्ये दहावी व बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ केले जाणार आहे.
टंचाईग्रस्त गावांमध्ये गडचिरोली तालुक्यातील कनेरी, पारडीकुपी, मुडझा बुजू, मुडझा तुकूम, पुलखल, कोसनघाट, करकाझोरा, मौशीखांब, मरेगाव पॅच, मुलचेरा तालुक्यातील कोपरअली माल, मल्लेरा, कोपरअली चेक, देवदा, वेंगनूर, अंडगेपल्ली, सुरगाव, बोलेपल्ली, हेटाळकसा, पुल्लीगुंडम, गरंजी, देसाईगंज तालुक्यातील सावंगी, गांधीनगर, चोप, पेदा, कोरेगाव, एकलपूर, रामपूर तुकूम, बोडधा, बोडधा तुकूम, रावनवाडी, शंकरपूर, कळमगाव, शेलदालांबे, शेलदा तुकूम, डोंगरमेंढा, तुळशी, आमगाव, विसोरा, कसारी तुकूम, कुरूड, वडेगाव रिठ, कोकडी, किन्हाळा, शिवराजपूर, उसेगाव फरी, पोटेगाव, विठ्ठलगाव, डोंगरगाव, चिखलीरिठ, चिखली तुकूम, अरततोंडी, पिंपळगाव, विहीरगाव, विर्शी तुकूम, जुनी वडसा, नैनपूर या गावांचा समावेश आहे.
संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कमाफीचे अर्ज भरण्यास सुरूवात केली आहे.

आरमोरी तालुक्यातील ९७ गावांचा समावेश
आरमोरी तालुक्यात सर्वाधिक ९७ गावे टंचाईग्रस्त घोषीत केली आहेत. यामध्ये जोगीसाखरा ग्रामपंचायतमधील गावे पळसगाव ग्रामपंचायत, कासवी, अरसोडा, वघाळा, आरमोरी नगर पंचायत, सायगाव, शिवनी बुज., शंकरनगर, चामोर्शी माल, वासाळा, ठाणेगाव, डोंगरगाव बुज., वैरागड, सुकाळा, मोहझरी, देलनवाडी, मानापूर, कुलकुली, भाकरोंडी, नूरचुली, कोरेगाव, पिसेवडधा, कुरंडी माल, वडधा, बोरी चक, देलोडा बुज., सिर्सी, कोसबी, इंजेवारी, देऊळगाव, किटाळी, चुरमुरा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
कोरची तालुक्यातील कोटरा, बोगाटोला व सिरोंचा तालुक्यातील बेजुरपल्ली ग्रामपंचायतमधील गावांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ मिळणार आहे.

Web Title: 167 students of the village will get the fee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.