जिल्ह्यातील १७ राईस मिल काळ्या यादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:38 AM2021-07-30T04:38:40+5:302021-07-30T04:38:40+5:30
काळ्या यादीत टाकलेल्या राईस मिलमध्ये अरिहंत फूड प्रॉडक्ट चामोर्शी, गुरुदेव फूड प्रॉडक्ट वडसा, दिलीप राईस ॲन्ड ॲग्रो इंडस्ट्रीज वडसा, ...
काळ्या यादीत टाकलेल्या राईस मिलमध्ये अरिहंत फूड प्रॉडक्ट चामोर्शी, गुरुदेव फूड प्रॉडक्ट वडसा, दिलीप राईस ॲन्ड ॲग्रो इंडस्ट्रीज वडसा, राजमाता राईस इंडस्ट्रीज सावंगी, विश्वास राईस मिल शंकरपूर, शिवकृपा राईस मिल चोप, साईबाबा राईस मिल आरमोरी, गोंडवाना राईस मिल पोटेगाव, महानंदा राईस मिल मुरमाडी, माहेश्वरी ॲग्रो इंडस्ट्रीज अमिर्झा, साईबाबा राईस मिल मौशीखांब, महाभगवती राईस ॲन्ड ॲग्रो इंडस्ट्रीज मुरखडा, साई राईस इंडस्ट्रीज कोपुर्डी, श्रीहरी राईस मिल चामोर्शी आणि श्रीकृष्ण राईस मिल घोट या १७ मिलचा समावेश आहे.
(बॉक्स)
चंद्रपूर, गोंदियाच्या मिलकडून भरडाई
उघड्यावरील धानाची लवकर भरडाई व्हावी आणि धान खराब होऊ नये यासाठी इतर जिल्ह्यातील मिलची मदत घेण्यात आली. यात गोंदिया जिल्ह्यातील ५४, चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तसेच भंडारा जिल्ह्यातील ३ आणि नागपूर जिल्ह्यातील एका राईस मिलकडून धानाची भरडाई करून घेतली जात आहे. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यातील बऱ्याच मिल धानाची भरडाई करत आहे. आता केवळ ३ लाख क्विंटल धान भरडाईसाठी शिल्लक असून येत्या १५ दिवसात पूर्ण धानाची भरडाई होईल, असा विश्वास पुरवठा विभागाची अधिकारी व्यक्त करत आहेत.