१७० विद्यार्थ्यांना मिळाले गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 02:20 AM2017-07-20T02:20:04+5:302017-07-20T02:20:04+5:30

चामोर्शी शहरातील अनेक शाळांमध्ये नगर पंचायतीचे उपाध्यक्ष राहूल नैताम व मित्र परिवाराकडून एकूण १७० गणवेशाचे वितरण

170 students got uniforms | १७० विद्यार्थ्यांना मिळाले गणवेश

१७० विद्यार्थ्यांना मिळाले गणवेश

Next

चामोर्शीत वितरण : न. पं. उपाध्यक्षांसह सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी शहरातील अनेक शाळांमध्ये नगर पंचायतीचे उपाध्यक्ष राहूल नैताम व मित्र परिवाराकडून एकूण १७० गणवेशाचे वितरण आठवड्यात करण्यात आले. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला.
चामोर्शी येथील कृषक हायस्कूलमध्ये मंगळवारी न. पं. उपाध्यक्ष राहूल नैताम व मित्र परिवार यांच्याकडून ३० मुलामुलींना गणवेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी न. पं. उपाध्यक्ष राहूल नैताम, मुख्याध्यापक अरविंद भांडेकर, धनराज मडावी, शिक्षक संजय कुनघाडकर, मोरेश्वर गडकर, लोमेश्वर पिपरे, गिरीष मुंजमकर, प्रकाश मठ्ठे, जासुंदा जनबंधू, वर्षा लोहकरे, लोमेश बुरांडे, दिलीप लटारे, अरूण दुधबावरे, दिलीप भांडेकर, मारोती दिकोंडावार उपस्थित होते. शहरातील जि. प. नूतन शाळेमध्ये २० गणवेश, जि. प. कन्या शाळेत २०, जि. प. प्राथमिक शाळा शंकरपूर हेटी येथे ३० गणवेश, शिवाजी हायस्कूलमध्ये २० गणवेश, यशोधरा विद्यालयात ३० गणवेश, बा. म. सहारे प्राथमिक शाळेत २० गणवेश, कृषक हायस्कूलमध्ये ३० गणवेश असे एकूण सात शाळांमध्ये गरीब व गरजू विद्यार्थ्यांना १७० शालेय गणवेशाचे वितरण व साहित्य वाटप करण्यात आले.
न. पं. उपाध्यक्ष राहूल नैताम व मित्र परिवाराकडून दरवर्षी गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, बुक, कंपास, पेन, पेन्सिल, साहित्याचे वाटप करण्यात येते. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे पालकांकडून कौतुक होत आहे. गणवेश व शालेय वितरण प्रसंगी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. विशेष म्हणजे प्रत्येक शाळांमध्ये जाऊन गणवेश व शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.

Web Title: 170 students got uniforms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.