दारूबंदीसाठी १८ गावे सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:28 AM2020-12-25T04:28:56+5:302020-12-25T04:28:56+5:30

बैठकीला सामाजिक कार्यकर्ते संतोष सावळकर, इलाखा अध्यक्ष शत्रुजी नरोटे, इलाखा ग्रामसभा अध्यक्ष भाऊजी नरोटे, इलाख्यातील सदस्य, गाव पाटील व ...

18 villages moved for ban on alcohol | दारूबंदीसाठी १८ गावे सरसावली

दारूबंदीसाठी १८ गावे सरसावली

Next

बैठकीला सामाजिक कार्यकर्ते संतोष सावळकर, इलाखा अध्यक्ष शत्रुजी नरोटे, इलाखा ग्रामसभा अध्यक्ष भाऊजी नरोटे, इलाख्यातील सदस्य, गाव पाटील व मुक्तिपथ चमू उपस्थित होते. सभेमध्ये दारूबंदी मजबूत करण्यासाठी कृती कार्यक्रम तयार करण्यात आला. गाव संघटनाच्या माध्यमातून गावातून दारू हद्दपार करणे. दारूबंदी अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने सहभाग दिला पाहिजे. दारूबंदीमुळे जिल्ह्याचा फायदा लक्षात घेता एकूण ८५० गावांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतला आहे. दारूबंदी अधिक मजबूत करण्यासाठी काय करता येईल. आदी विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

सभेला मार्गदर्शन करताना डॉ. आनंद बंग म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असल्यामुळे १० पटीने दारूविक्री कमी आहे. दारूबंदी हाच विकासाचा पाया आहे. बंदी उठविल्यास दारूवर ५०० कोटी रुपये खर्च होतील. म्हणजेच जिल्हा विकासाच्या बजेटहून दुप्पट खर्च दारूवर होईल. दारूवर प्रत्येक गावातून ३५ लक्ष रुपये खर्च होतील. जिल्ह्याचा विकास खुंटेल. त्यामुळे जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असे मत बंग यांनी मांडले.

Web Title: 18 villages moved for ban on alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.