१८४ किमी रस्त्यांची कामे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 01:24 AM2018-03-24T01:24:40+5:302018-03-24T01:24:40+5:30

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रखडलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या नवीन कामांना आता मंजुरी मिळाली आहे. वर्ष २०१७-१८ या आर्थिक वर्षातील निधीतून ....

184 km road works approved | १८४ किमी रस्त्यांची कामे मंजूर

१८४ किमी रस्त्यांची कामे मंजूर

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री ग्रामसडक योजना : २०१७-१८ मधील ३६ कामांची एप्रिलमध्ये सुरूवात

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रखडलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या नवीन कामांना आता मंजुरी मिळाली आहे. वर्ष २०१७-१८ या आर्थिक वर्षातील निधीतून वर्ष संपताना १८४ किलोमीटरच्या ३६ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. लवकरच त्याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन आर्थिक वर्षात (२०१८-१९) ही कामे सुरू होणार आहेत.
रस्त्यांच्या बांधकामासाठी ३६ रस्त्यांची एकूण किंमत १२१ कोटी १८ लाख ७४ हजार रुपये आहे. त्यात ५ कोटी ९९ लाखांची दोन कामे नाबार्ड अंतर्गत मंजूर असून ४१ कोटी २५ लाख ८३ हजार रुपयांची १४ कामे टप्पा १ मध्ये आणि ७३ कोटी ९३ लाख ३४ हजार रुपयांची २० कामे टप्पा-३ मध्ये ग्रामविकास विभागाकडून मंजूर झाली आहेत. याशिवाय या सर्व रस्त्यांच्या ५ वर्षेपर्यंत नियमित देखभाल व दुरूस्तीसाठी ७ कोटी ८२ लाख १९ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच सुरूवात होणार असलेल्या या कामांमध्ये गडचिरोली तालुक्यात साखर ते धुंडेशिवनी रस्ता, अमिर्झा-बोथेडा रस्ता व प्रस्तावित राष्ट्रीय मार्ग १० ते पुलखल मुडझा रस्ता, मुलचेरा तालुक्यात बामनपेठा ते अडपल्ली चेक ते राष्ट्रीय मार्ग ३७८ पर्यंतचा रस्ता, राष्ट्रीय मार्ग ३७८ ते विजयनगर, गांधीनगर, अडपल्लीमाल रस्ता आणि विश्वनाथनगर ते कोळसापूर रस्त्याचा समावेश आहे. कोरची तालुक्यात कोरची, बेठकाठी ते बोरी रस्ता, राष्ट्रीय मार्ग ३१४ ते बेडगाव बोरी रस्ता, कुरखेडा तालुक्यात पळसगड ते चारभट्टी रस्ता, राष्ट्रीय मार्ग ३६३ ते वाकडी रस्ता, चामोर्शी तालुक्यात तळोधी ते जोगना रस्ता, राष्ट्रीय मार्ग ३७० ते विष्णूपूर रस्ता, राष्ट्रीय मार्ग ३७० ते वाघोली वेलतूर एकोडी रस्ता, राष्ट्रीय मार्ग ३७० ते फोकुर्डी ते मुरखळाचक रस्ता अशा रस्त्यांचा समावेश आहे.
अहेरी तालुक्यात प्रस्तावित राष्ट्रीय मार्ग ०९ ते झिमेला रस्ता, आपापल्ली ते चिचोडा रस्ता, रा.मार्ग ३७६ ते यंकाबंडा रस्ता, पेरमिली ते कोरेली रस्ता, पेरमिली ते येरमनार रस्ता, रा.मार्ग ३७० ते मुदुमतुरा ते काटेपल्ली देवलमरी रस्ता, प्र.रा.मार्ग ०९ कोलाकर्जी राजाराम खांदला अरेंदा रस्ता आदींचा समावेश आहे. एटापल्ली तालुक्यात रा.मार्ग ३६३ ते वाघेझरी रस्ता, हालेवारा ते कमके रस्ता, सिरोंचा तालुक्यात राष्ट्रीय मार्ग १६ ते सोमनपल्ली रस्ता, प्रस्तावित राष्ट्रीय मार्ग ०९ बामणी टेकला येल्ला, नससिहापल्ली, कोटापल्ली, मोयाबिनपेठा रस्ता तसेच राष्ट्रीयय मार्ग ०९ रंगय्यापल्ली ते वियमपल्ली रस्ता आणि प्र.राष्ट्रीय मार्ग ०९ मेडाराम माल, सिरकोंडा या रस्त्यांचा समावेश आहे. वडसा तालुक्यात राष्ट्रीय मार्ग ३१५ ते डोंगरमेंढा रस्ता, आरमोरी तालुक्यात प्रस्तावित राष्ट्रीय मार्ग ११ ते डोंगरसावंगी रस्ता, धानोरा तालुक्यात राष्ट्रीय मार्ग ३७५ ते गोटे विहीर रस्ता, मोडेभट्टी ते तुलावी टोला रस्ता, राष्ट्रीय मार्ग ३७८ ते उशीरपार रस्ता, राष्ट्रीय मार्ग ३३८ ते चिंगली ते भान्सी रस्ता, मोवाड ते खेडी रस्ता आणि राष्ट्रीय मार्ग ३७५ ते कारवाफा रस्ता आदी रस्त्यांचा समावेश आहे.
या योजनेअंतर्गत प्रलंबित असलेली २०१५-१६ मधील २० रस्त्यांची कामे मे २०१८ पर्यंत आणि २०१६-१७ मधील ५१ प्रलंबित कामे डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. इतर योजनांच्या निधीप्रमाणे या कामांचा निधी शासनाकडे परत जात नसल्यामुळे ती कामे सुरू आहेत.
भामरागडला डच्चू !
भामरागड तालुक्यात काही मार्गांची दुरवस्था झाली आहे. त्या रस्त्यांची प्राधान्याने दुरूस्ती करणे गरजेचे आहे. मात्र नुकत्याच मंजुरी मिळालेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये भामरागड तालुक्यातील एकही रस्ता नाही. ते रस्ते किमान जिल्हा परिषदेने तरी हाती घेऊन दुरूस्त करावेत अशी त्या परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

Web Title: 184 km road works approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.