निवृत्ती वेतन योजनेची १८६ प्रकरणे मंजूर
By Admin | Published: August 3, 2015 01:05 AM2015-08-03T01:05:11+5:302015-08-03T01:05:11+5:30
संजय गांधी निवृत्तीवेतन योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत स्थानिक तहसील कार्यालयात शनिवारी १८६ प्रकरणे मंजूर करण्यात आली.
देसाईगंज पं. स. : १३ वारसदारांना लाभ
देसाईगंज : संजय गांधी निवृत्तीवेतन योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत स्थानिक तहसील कार्यालयात शनिवारी १८६ प्रकरणे मंजूर करण्यात आली. तसेच आम आदमी विमा योजनेंतर्गत १३ वारसदारांना लाभ देण्यात आला.
देसाईगंज तालुक्यातील एकूण २३१ प्रकरणातील कार्यवाही करण्यात आली. यावेळी संजय गांधी योजनेतील ४४ प्रकरणांपैकी ३९ प्रकरणे मंजूर तर पाच प्रकरणे नामंजूर करण्यात आले. श्रावणबाळ, निवृत्तीवेतन योजनेंतर्गत १८७ प्रकरणांपैकी १४७ प्रकरणे मंजूर करण्यात आले. तर ४६ प्रकरणे त्रुट्यांअभावी नामंजूर करण्यात आली. आम आदमी विमा योजनेंतर्गत १३ जणांच्या मृत्यूदावा प्रकरणातील लाभाची रक्कम वारसदारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. संबंधितांनी नजीकच्या तलाठ्याकडून सदर माहिती प्राप्त करून घ्यावी, अशी माहिती तहसील कार्यालयामार्फत संबंधितांना देण्यात आली. योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. बैठकीला देसाईगंजचे तहसीलदार अजय करडे, नायब तहसीलदार एन. बी. मडावी, संवर्ग विकास अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)