१८७१ शेतकऱ्यांना बियाणांची लाॅटरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:27 AM2021-06-04T04:27:45+5:302021-06-04T04:27:45+5:30
गडचिराेली : राष्ट्रीय अन्नसुरक्षा याेजनेंतर्गत बियाणांवर अनुदान देण्यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले हाेते. जिल्हाभरातील शेतकऱ्यांकडून २ हजार २२९ ...
गडचिराेली : राष्ट्रीय अन्नसुरक्षा याेजनेंतर्गत बियाणांवर अनुदान देण्यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले हाेते. जिल्हाभरातील शेतकऱ्यांकडून २ हजार २२९ अर्ज प्राप्त झाले. लाभार्थी निवडीसाठी पहिल्या टप्प्यात लाॅटरी काढण्यात आली आहे. त्यामध्ये १ हजार ६७७ शेतकऱ्यांना धान बियाणे व १९४ शेतकऱ्यांना तूर बियाणांसाठी अनुदान दिले जाणार आहे.
शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतिचे बियाणे वापरावे यासाठी शासनामार्फत अनुदान दिले जाते. अनुदान देण्यासाठी महाडीबीटी पाेर्टलवर ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले हाेते. मात्र ऑनलाइन अर्जांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. जिल्ह्यातील ४ हजार ६०२ शेतकऱ्यांना धान व ५४४ शेतकऱ्यांना तूर बियाणांवर अनुदान द्यायचे हाेते. मात्र या दाेन्ही याेजनांसाठी केवळ दोन हजार २२९ अर्ज प्राप्त झाले. प्राप्त अर्जांची लाॅटरी काढण्यात आली. त्यामध्ये १ हजार ६७७ शेतकऱ्यांना धानासाठी, तर १९४ शेतकऱ्यांना तूर बियाणांसाठी अनुदान दिले जाणार आहे.
धानासाठी ६०० रुपये, तर तुरीसाठी २५० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना लाॅटरी लागली आहे, त्या शेतकऱ्यांना एसएमएस प्राप्त झाला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून परमिट प्राप्त करून ठरवून दिलेल्या कृषी केंद्रातून बियाणे खरेदी करायचे आहे. परमिटवर दिलेली रक्कम अदा करून उर्वरित रक्कम दुकानदारांना द्यावी लागणार आहे.
बाॅक्स...
ऑफलाइन अर्ज स्वीकारणार
- ऑनलाइन अर्जांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. जिल्ह्यात ४ हजार ६०२ धान उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यायचे हाेते. मात्र प्रत्यक्षात केवळ दोन हजार २२९ अर्ज प्राप्त झाले आहेत. उद्दिष्टाच्या तुलनेत अर्जांची संख्या कमी आहे. उर्वरित शेतकऱ्यांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविले जाणार आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात हे अर्ज जमा करायचे आहेत.
- २ हजार २२९ शेतकऱ्यांनी अर्ज केले. मात्र अनुदानाची लाॅटरी केवळ १ हजार ८७१ शेतकऱ्यांनाच लागली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनाही दुसऱ्या टप्प्यात लवकरच लाॅटरी काढून अनुदान दिले जाणार आहे.
बाॅक्स...
अनुदान वाढविण्याची गरज
प्रत्येक शेतकऱ्याला केवळ ६०० रुपये अनुदान दिले जाते. अर्ज भरणे, परमिट आणणे, नेमून दिलेल्याच कृषी केंद्रात बियाणे खरेदी करणे यासाठी अनेक चकरा माराव्या लागतात. मात्र प्रत्येक शेतकऱ्याला केवळ ६०० रुपये अनुदान दिले जाते. अनुदान कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांना माहीत असूनही ते अर्ज करीत नाही. अनुदान वाढविल्यास अर्जांची संख्या वाढू शकते.
काेट...
महाडीबीटी पाेर्टलवर बियाणांसाठी अर्ज केला हाेता. उद्दिष्टाच्या तुलनेत अर्जांची संख्या कमी असल्याने आपल्या बियाणे मिळेल, अशी अपेक्षा हाेती. मात्र आम्हाला एसएमएस प्राप्त झालाच नाही. त्यामुळे बियाणे मिळणार की नाही, याबाबत शंका आहे. आमचा अर्ज गेला कुठे? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. उशिरा बियाणे मिळाल्यास त्याचा काहीच फायदा नाही.
- बाबूराव लाजूरकर, शेतकरी
बाॅक्स...
अनुदानित बियाणांसाठी आलेले अर्ज - २,२२९
लाॅटरी लागलेले शेतकरी - १८७१