आरोग्य व इतर सुविधांसाठी केली ११ कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:09 AM2020-02-28T00:09:27+5:302020-02-28T00:10:02+5:30

गडचिरोली शहरात नगर परिषदेमार्फत नगर परिषदेमार्फत पाणीपुरवठा केला जाते. प्रत्येक नळ जोडधारकाकडून नगर परिषद दीड हजार रुपये प्रती वर्ष कर गोळा करणार आहे. २०२०-२१ या वर्षात पाणीपट्टीच्या माध्यमातून १ कोटी ४६ लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे. पाणीपुरवठ्यावर वर्षभरात होणारा खर्च २ कोटी ७७ लाख ६० हजार रुपये आहे.

19 crore provided for health and other facilities | आरोग्य व इतर सुविधांसाठी केली ११ कोटींची तरतूद

आरोग्य व इतर सुविधांसाठी केली ११ कोटींची तरतूद

Next
ठळक मुद्देपाणी पुरवठा योजना तोट्यातच : गडचिरोली न.प.चा अर्थसंकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरवासीयांसाठी आवश्यक असलेल्या आरोग्यविषयक बाबी आणि इतर सुविधांचे महत्त्व लक्षात घेता त्यासाठी नगर परिषदेच्या अंदाजपत्रकात सुमारे ११ कोटी ७ लाख ९४ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सदर निधी आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा व इतर महत्त्वाच्या बाबींवर खर्च केला जाणार आहे. जनतेच्या दृष्टीने सोयीसुविधांचे महत्त्व लक्षात घेता मागील वर्षीच्या तुलनेत दोन कोटी रुपयांची अधिकची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.
गडचिरोली शहरात नगर परिषदेमार्फत नगर परिषदेमार्फत पाणीपुरवठा केला जाते. प्रत्येक नळ जोडधारकाकडून नगर परिषद दीड हजार रुपये प्रती वर्ष कर गोळा करणार आहे. २०२०-२१ या वर्षात पाणीपट्टीच्या माध्यमातून १ कोटी ४६ लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे. पाणीपुरवठ्यावर वर्षभरात होणारा खर्च २ कोटी ७७ लाख ६० हजार रुपये आहे. नगर परिषदेला मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत पाणीपुरवठ्यावर होणारा खर्च १ कोटी ३१ लाख रुपयांनी अधिक आहे. पाणीपुरवठा विभागाच्या स्थायी आस्थापनेवर ३० हजार लाख रुपये, अस्थायी अस्थापनेवर ९ लाख रुपये खर्च होणार आहे. बोअरवेल दुरूस्ती व पाईपलाईन लिकेज दुरूस्तीसाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी ३ लाख रुपयांची तरतूद आहे. आलम खरेदीसाठी १५ लाख रुपये, ब्लिचिंग पावडर व क्लोरिन गॅस खरेदीसाठी १६ लाख रुपयांची तरतूद आहे.
सार्वजनिक विहिरींच्या दुरूस्तीसाठी १० लाख रुपयांची तरतूद केली आहे. नगर परिषदेकडे काही वाहने आहेत. या वाहनांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी चार लाख रुपयांची तरतूद आहे. पाणपोईसाठी एक लाख रुपये, आपत्ती व्यवस्थापनासाठी दोन लाख रुपये, स्वच्छ सर्वेक्षणासाठी अडीच लाख रुपये, सफाई कामगारांना ड्रेस, मोजे खरेदी करण्यासाठी दोन लाख रुपये, दुर्बल घटकांना अंत्यसंस्काराला लाकडे पुरविण्यासाठी ६० हजार रुपयांची तरतूद केली आहे.
नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सत्तारूढ आहेत. राज्यात महाआघाडी सरकार सत्तारूढ होण्याआधी सत्तेत असलेल्या भाजप सरकारने शेवटच्या टप्प्यात अनेक नगर परिषदांना भरीव निधी दिला होता. तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे काही दिवस जिल्ह्याचे पालकत्व आल्यानंतर त्यांनीही न.प.ला निधीची दिला होता.

प्राधिकरणच्या कर्जाची परतफेड
गडचिरोली शहराची पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत बांधण्यात आली. यासाठी नगर परिषदेने प्राधिकरणकडून कर्ज घेतले होते. मात्र मागील अनेक वर्ष या कर्जाची परतफेड केली जात नव्हती. त्यामुळे या कर्जावरील व्याज वाढतच चालले होते. मागील वर्षीपासून या कर्जाची परतफेड केली जात आहे. मागील वर्षी ४० लाख रुपये परतफेड करण्यात आले, तर यावर्षी ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

न.प.च्या शाळांसाठी ५१ लाखांचे नियोजन
नगर परिषदेमार्फत प्राथमिक शाळा चालविल्या जातात. इंग्रजी माध्यमांच्या शाळांसोबत स्पर्धा करायची असेल तर नगर परिषदेच्या शाळा विकसित करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन शाळांमध्ये सुविधा निर्माण करण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. २०२०-२१ मध्ये १० लाख रुपयांचे डेस्क-बेंच, विद्यार्थ्यांसाठी १६ लाख रुपयांचे गणवेश व बुट तसेच इतर साहित्य खरेदी केले जाणार आहेत. क्रीडा महोत्सवासाठी १५ लाख रुपये, शाळा रंगरंगोटीसाठी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

महिला व बालकल्याणसाठी ११ लाखांची तरतूद
दारिद्र्य निर्मूलनासाठी नगर परिषदेने ११ लाख ७६ हजार रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी आस्थापनेवर ७ लाख ७० हजार तर महिला व बाल कल्याणासाठी ४ लाख ६ हजार रुपयांची तरतूद केली आहे. रोगप्रतिबंधक लस खरेदीसाठी ३० हजार रुपये, फवारणीसाठी ३० हजार रुपये अशी एकूण ६० हजार रुपयांची तरतूद केली आहे. या निधीतून महिला व बालकल्याणसाठी विविध योजना राबविल्या जातील.

Web Title: 19 crore provided for health and other facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.