आठवड्यात १९ टक्के रोवणी

By admin | Published: August 3, 2014 12:05 AM2014-08-03T00:05:44+5:302014-08-03T00:05:44+5:30

सुरूवातीला तब्बल दीड महिना पावसाने दडी मारली होती. त्यानंतर चार ते पाच दिवस संततधार पाऊस बरसला. या पावसामुळे शेतकरी जोमाने रोवणीच्या कामाला लागला. मात्र पुन्हा पावसाने उसंत

19 percent of the seedlings in the week | आठवड्यात १९ टक्के रोवणी

आठवड्यात १९ टक्के रोवणी

Next

गडचिरोली : सुरूवातीला तब्बल दीड महिना पावसाने दडी मारली होती. त्यानंतर चार ते पाच दिवस संततधार पाऊस बरसला. या पावसामुळे शेतकरी जोमाने रोवणीच्या कामाला लागला. मात्र पुन्हा पावसाने उसंत घेतल्यामुळे रोवणीचे काम मंदावले. २४ जुलै ते १ आॅगस्ट या आठवड्यात केवळ १९ टक्के हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची रोवणी झाली असल्याचे कृषी विभागाच्या पेरणी अहवालावरून दिसून येते. मागील आठवड्यात फक्त ८ टक्के हेक्टर क्षेत्रावर रोवणी झाली आहे.
कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोली तालुक्यात आतापर्यंत एकूण ३ हजार ५९ हेक्टर क्षेत्रावर रोवणी झाली आहे. चामोर्शी तालुक्यात ४ हजार १०५, धानोरा तालुक्यात ३ हजार ६२३, मुलचेरा तालुक्यात २ हजार ४७५, देसाईगंज तालुक्यात ३ हजार ५०९, आरमोरी तालुक्यात १ हजार ६५५, कुरखेडा तालुक्यात ३ हजार ७१४, कोरची तालुक्यात २ हजार ७१, अहेरी तालुक्यात ६०८, भामरागड तालुक्यात ११२, एटापल्ली तालुक्यात ६३१ आणि सिरोंचा तालुक्यात २१६ हेक्टर क्षेत्रावर रोवणी झाली आहे. या रोवणीची टक्केवारी २७ इतकी आहे. गडचिरोली तालुक्यात आतापर्यंत २ हजार ८७६ हेक्टर क्षेत्रात आवत्या टाकण्यात आले आहे. चामोर्शी तालुक्यात ३ हजार १५५, धानोरा तालुक्यात ४ हजार ७६०, मुलचेरा तालुक्यात ४८१, देसाईगंज तालुक्यात ४६७, आरमोरी तालुक्यात ५ हजार ६३०, कुरखेडा तालुक्यात १ हजार ६३५, कोरची तालुक्यात ६ हजार २१९, अहेरी तालुक्यात १ हजार ७३८, भामरागड तालुक्यात ४ हजार १००, एटापल्ली तालुक्यात ६ हजार ३१७, सिरोंचा तालुक्यात २ हजार २३७ हेक्टर क्षेत्रात आवत्या टाकण्यात आले आहे.
जिल्ह्यातील आवत्याची टक्केवारी ७३ इतकी आहे. आतापर्यंत गडचिरोली तालुक्यात रोवणी व आवत्या मिळून एकूण भात पिकाची प्रत्यक्ष पेरणी ६५ हजार ३९३ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी गडचिरोली तालुक्यात ५ हजार ९३५, चामोर्शी ७ हजार २६०, धानोरा ८ हजार ३८३, मुलचेरा २ हजार ९५६, देसाईगंज ३ हजार ९७६, आरमोरी ७ हजार २८५, कुरखेडा ५ हजार ३४९, कोरची ८ हजार २९०, अहेरी २ हजार ३४६, भामरागड ४ हजार २१२, एटापल्ली ६ हजार ९४८ आणि सिरोंचा तालुक्यात २ हजा ४५३ हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष भात पिकाची रोवणी झाली आहे. प्रत्यक्ष पेरणीची जिल्ह्याची टक्केवारी ४४ इतकी आहे.
मागील आठवड्यात २४ जुलैपर्यंत गडचिरोली तालुक्यात १ हजार ३३२ हेक्टर क्षेत्रात, चामोर्शी तालुक्यात २ हजार १६८, धानोरा तालुक्यात १ हजार १४, मुलचेरा तालुक्यात ६५६, देसाईगंज तालुक्यात ६१०, आरमोरी तालुक्यात ६५ हेक्टर क्षेत्रात रोवणी झाली होती. कुरखेडा तालुक्यात ९१९, कोरची तालुक्यात १५९, अहेरी तालुक्यात २७ हेक्टर क्षेत्र, भामरागड तालुक्यात २६ हेक्टर क्षेत्र, एटापल्ली तालुक्यात २०६ हेक्टर क्षेत्रावर रोवणी झाली होती. जिल्ह्यात मागील आठवड्यात बाराही तालुके मिळून एकूण ७ हजार ३८२ हेक्टर क्षेत्रावर रोवणी झाली असून त्याची टक्केवारी ८ होती.
संततधार पाऊस बरसल्यानंतर चार-पाच दिवस जिल्हाभरात रोवणीला वेग आला होता. मात्र त्यानंतर पुन्हा उसंत घेतल्यानंतर पावसाअभावी रोवणीचे काम मंदावले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 19 percent of the seedlings in the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.