विविध कार्यक्रमांनी साजरा झाला १९२ बटालियनचा स्थापना दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:30 AM2017-09-13T00:30:43+5:302017-09-13T00:30:43+5:30

नक्षल बंदोबस्तासाठी जिल्ह्यात कार्यरत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) १९२ बटालियनचा स्थापना दिवस मंगळवारी गडचिरोली येथील बटालियन मुख्यालयात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

192 battalion's foundation day celebrated by various programs | विविध कार्यक्रमांनी साजरा झाला १९२ बटालियनचा स्थापना दिवस

विविध कार्यक्रमांनी साजरा झाला १९२ बटालियनचा स्थापना दिवस

Next
ठळक मुद्देमहानिरीक्षकांची उपस्थिती : अधिकारी-जवानांचे सांस्कृतिक कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षल बंदोबस्तासाठी जिल्ह्यात कार्यरत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) १९२ बटालियनचा स्थापना दिवस मंगळवारी गडचिरोली येथील बटालियन मुख्यालयात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सीआरपीएफचे महानिरीक्षक राजकुमार, उपमहानिरीक्षक टी.शेखर, कमांडंट मनोज कुमार, देसाईगंज येथील ११३ बटालियनचे कमांडंट प्रभाकर त्रिपाठी, प्राणहिता के कमांडंट श्रीराम मीना, कमांडंट रविंद्र भगत, द्वितीय कमांडंट अधिकारी दीपक कुमार, उपकमांडंट संध्या राणी, दीपक साहू, आर.के.श्रीवास्तव, कैलास गंगावणे, डॉ.वसंत कुंभारे आदी पाहुणे उपस्थित होते.
दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यात प्रामुख्याने मडके फोडणे स्पर्धा, चक्का-सिक्का, नेमबाजी, बॉलफेक अशा विविध स्पर्धांचा समावेश होता. संध्याकाळी विविध रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात सर्व जवानांनी उत्साहाने सहभाग घेऊन दैनंदिन कामाचा ताण हलका केला. वर्ष २००९ पासून सीआरपीएफच्या बटालियन गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सीआरपीएफ जवानांनी सहकार्य केले.

 

Web Title: 192 battalion's foundation day celebrated by various programs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.