१९९ कोटी पीक कर्ज वाटपाचे दिले उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 05:00 AM2020-05-11T05:00:00+5:302020-05-11T05:00:45+5:30

कर्जासाठी शेतकऱ्यावर सावकाराच्या दारात उभे राहण्याची पाळी येऊ नये, यासाठी शासनाने पीक कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी सदर शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्ज भरणे आवश्यक आहे. बिनव्याजी कर्ज मिळत असल्याने शेतकरी सुध्दा बँकांकडून कर्जाची मागणी करतात.

199 crore crop loan disbursement target | १९९ कोटी पीक कर्ज वाटपाचे दिले उद्दिष्ट

१९९ कोटी पीक कर्ज वाटपाचे दिले उद्दिष्ट

Next
ठळक मुद्देबँकांना निर्देश : को-आॅपरेटीव्ह बँकेला सर्वाधिक टार्गेट

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : २०२० च्या खरीप व रबी हंगामात जिल्हाभरातील ३३ हजार १५६ शेतकऱ्यांना १९९ कोटी १८ हजार रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
कर्जासाठी शेतकऱ्यावर सावकाराच्या दारात उभे राहण्याची पाळी येऊ नये, यासाठी शासनाने पीक कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी सदर शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्ज भरणे आवश्यक आहे. बिनव्याजी कर्ज मिळत असल्याने शेतकरी सुध्दा बँकांकडून कर्जाची मागणी करतात. बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास सहजासहजी तयार होत नसल्याने प्रत्येक बँकेला कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिले जाते. २०२० च्या खरीप व रबी हंगामासाठी ३३ हजार १५६ शेतकऱ्यांना किमान १९९ कोटी १८ हजार रुपयांचे कर्ज वितरित करावे, असे निर्देश दिले आहेत. प्रत्येक बँकेला कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. ठरवून दिलेल्या उद्दिष्टापर्यंत बँका कधीच कर्ज वाटप करीत नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे यावर्षी किती कर्ज वाटप करतात, याकडे लक्ष लागले आहे.

कर्ज वितरण प्रक्रियेला कोरोनाचा फटका
कोरोनामुळे बँकेत शारीरिक अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच केवळ पैसे काढणे व पैसे घेणे यावर मुख्य भर द्यावा, असे निर्देश राष्ट्रीयकृत बँकांच्या मध्यवर्ती कार्यालयांनी बँकांना दिले आहेत. त्यामुळे आजपर्यंत केवळ पैसे काढणे व पैसे भरणे एवढेच व्यवहार केले जात होते. आता खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकरी पीक कर्जासाठी अर्ज करण्याबाबत विचारणा करीत आहेत. मात्र आणखी काही दिवस थांबा, असा सल्ला बँकांकडून दिला जात आहे.

मागील वर्षी ९६ कोटींचे कर्ज वितरण
मागील वर्षी खरीप हंगामासाठी १५७ कोटी तर रबी हंगामासाठी २३ कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. खरीप हंगामासाठी ९५ कोटी ७६ लाख रुपयांचे कर्ज वितरण झाले. तर रबी हंगामासाठी केवळ २६ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. शेतकऱ्यांकडे आता सिंचनाची सुविधा झाल्याने अनेक शेतकरी उन्हाळ्यातही रबी हंगामाचे पीक घेतात. मात्र रबी हंगामासाठी कर्ज दिले जाते. याची अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही. त्यामुळे ते कर्ज घेत नसल्याचे दिसून येते. काही शेतकरी खरीप पिकाची तोडणी झाल्यावर त्याच शेतात रबी पिकांची लागवड करतात.

Web Title: 199 crore crop loan disbursement target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.