मार्कंडेश्वराच्या चरणी २ लाख ८४ हजारांचे दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:09 PM2019-03-11T22:09:24+5:302019-03-11T22:09:40+5:30

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कंडेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी यावर्षी २ लाख ८४ हजार ८५ रुपयांचे दान केले आहे. मागील वर्षीच्या जत्रेत २ लाख ५८ हजार रुपयांचे दान प्राप्त झाले होते.

2 lakh 84 thousand donations in the footsteps of Markandeshwar | मार्कंडेश्वराच्या चरणी २ लाख ८४ हजारांचे दान

मार्कंडेश्वराच्या चरणी २ लाख ८४ हजारांचे दान

Next
ठळक मुद्देगुप्त दान : पावतीच्या माध्यमातून ६२ हजार ७०० रुपये जमा

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी/मार्र्कंडादेव : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कंडेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी यावर्षी २ लाख ८४ हजार ८५ रुपयांचे दान केले आहे. मागील वर्षीच्या जत्रेत २ लाख ५८ हजार रुपयांचे दान प्राप्त झाले होते.
मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त ४ मार्चपासून जत्रेला सुरूवात झाली. मार्र्कंडेश्वराचे मंदिर व इतर देखभाल करण्यासाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली. या ट्रस्टच्या वतीने यात्रेदरम्यान देवस्थान परिसरात गुप्तदानपेट्या लावण्यात आल्या होत्या. १० मार्च रोजी गुप्त दानाची मोजणी देवस्थान कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. गुप्त दानपेट्यांमध्ये भाविकांनी २ लाख ८४ हजार ८५ रुपये गोळा केले होते. तसेच भाविकांकडून पावतीच्या स्वरूपात ६२ हजार ७०० रुपये प्राप्त झाले.
मार्र्कंडेश्वर देवस्थानचे सहसचिव रामूजी तिवाडे, मंडळ अधिकारी पी. डी. फुलझेले, तलाठी एस. जी. भरडरकर, जयराम चलाख, भैय्याजी चलाख, व्यवस्थापक जनार्धन जुनघरे, चंदू गेडाम, प्रभाकर गेडाम, पुरूषोत्तम शेंडे यांच्यासह पोलीस कर्मचारी व प्रतिष्ठीत नागरिक हजर होते. गुप्त दानातून प्राप्त झालेली संपूर्ण रक्कम बँकेत जमा करण्यात आली आहे, अशी माहिती श्री मार्र्कंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड यांनी दिली.

Web Title: 2 lakh 84 thousand donations in the footsteps of Markandeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.