रानभूमी जंगल परिसरातून २ क्विंटल मोहसडवा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:32 AM2021-03-14T04:32:12+5:302021-03-14T04:32:12+5:30
रानभूमी येथे अवैध दारू विक्री केली जाते. तालुक्यातील काही गावांना येथून दारू पुरवठा हाेताे. सोबतच गावात मद्यपींच्या रांगा सकाळ ...
रानभूमी येथे अवैध दारू विक्री केली जाते. तालुक्यातील काही गावांना येथून दारू पुरवठा हाेताे. सोबतच गावात मद्यपींच्या रांगा सकाळ व सायंकाळच्या सुमारास असतात. यामुळे परिसरातील अनेक गावे त्रस्त झाली आहेत. भांडणतंट्याचे प्रमाण वाढले आहेत. याबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी करण्यात आल्या. गडचिरोली पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या रानभूमी येथील जंगल परिसरात अहिंसक कृती करण्याचे ठरविले. त्यानुसार जंगल परिसरात शोधमोहीम राबवत दारू अड्डे उद्ध्वस्त केले. तसेच दोन क्विंटल मोहसडवा व इतर साहित्य नष्ट केले.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या आदेशाने ॲक्शन प्लॅननुसार तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांविरोधात मोहीम सुरू आहे. त्यानुसार तालुक्यातील दारू विक्रेत्यांविरोधात गडचिरोली पोलिसांचे धाडसत्र सुरू आहे. ही कारवाई गडचिरोलीचे ठाणेदार दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार सुनील बेसरकर, होमकांत मशाखेत्री, तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवणाथ मेश्राम यांनी केली.