मुरूमगाव केंद्रावरील २० हजार क्विंटल धान सडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:28 AM2020-12-25T04:28:49+5:302020-12-25T04:28:49+5:30

आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाने मुरूमगाव येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात पत्र दिले आहे. २५ डिसेंबरला केंद्राचे उद्घाटन ...

20,000 quintals of paddy rotted at Murumgaon center | मुरूमगाव केंद्रावरील २० हजार क्विंटल धान सडले

मुरूमगाव केंद्रावरील २० हजार क्विंटल धान सडले

Next

आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाने मुरूमगाव येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात पत्र दिले आहे. २५ डिसेंबरला केंद्राचे उद्घाटन केले जाणार आहे. परंतु मागील हंगामातील सडलेल्या धानाची याेग्य विल्हेवाट न लावता नवीन धानाची खरेदी कशाप्रकारे केली जाणार आहे, असा प्रश्नही नागरिक करीत आहेत. मागील वर्षी मुरूमगाव धान खरेदी केंद्राला सुरसुंडी, सावरगाव व येरकड आदी गावे जाेडण्यात आली. यावर्षी येरकड व मुरूमगाव येथे धान खरेदी करण्यसंदर्भात वरिष्ठ कार्यालयाचे पत्र मिळाले आहे.

बाॅक्स .....

नवीन नाेंदणी सुरू

धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना नाेंदणीकरिता कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सांगितले आहे. परंतु सडलेल्या धानाची याेग्य प्रकारे विल्हेवाट का करण्यात आली नाही, लिलाव प्रक्रियासुद्धा रखडली आहे. असे असताना २१ डिसेंबरपासून नवीन खरेदी ऑनलाईन नाेंदणी सुरू करण्यात आली. परंतु आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाने धान सुरक्षित ठेवण्यासाठी काहीच उपाययाेजना का केल्या नाही, असा सवालही नागरिकांनी केला आहे.

Web Title: 20,000 quintals of paddy rotted at Murumgaon center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.