२१ जणांचा मृत्यू, ६२२ नवीन काेराेनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:46 AM2021-04-30T04:46:10+5:302021-04-30T04:46:10+5:30

एकूण बाधितांची संख्या २० हजार ९७ झाली आहे. त्यापैकी कोरोनामुक्त झालेली संख्या १५ हजार ४७ झाली आहे. तसेच सध्या ...

21 killed, 622 injured | २१ जणांचा मृत्यू, ६२२ नवीन काेराेनाबाधित

२१ जणांचा मृत्यू, ६२२ नवीन काेराेनाबाधित

Next

एकूण बाधितांची संख्या २० हजार ९७ झाली आहे. त्यापैकी कोरोनामुक्त झालेली संख्या १५ हजार ४७ झाली आहे. तसेच सध्या ४,६७८ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३७२ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. २१ नवीन मृत्यूमध्ये ४० वर्षीय पुरुष कोजबी ता. आरमोरी, ५० वर्षीय पुरुष ता. आरमोरी, ६७ वर्षीय पुरुष ता. कुरखेडा, ५२ वर्षीय महिला नवेगाव गडचिरोली, ५२ वर्षीय पुरुष गडचिरोली, ७० वर्षीय महिला रामपुरी वाॅर्ड, गडचिरोली, ४४ वर्षीय पुरुष रामनगर गडचिरोली, ६२ वर्षीय पुरुष शंकरनगर, ५६ वर्षीय पुरुष बेलगाव ता. कोरची, ५४ वर्षीय पुरुष माता मंदिर गोकुलनगर गडचिरोली, ६१ वर्षीय पुरुष देसाईगंज, ४० वर्षीय पुरुष कुड्डीरामपल्ली ता. मुलचेरा, ५० वर्षीय पुरुष गोविंदपूर गडचिरोली, ६८ वर्षीय पुरुष गडचिरोली, ४६ वर्षीय महिला रामनगर गडचिरोली, ५४ वर्षीय पुरुष आरमोरी, ५० वर्षीय पुरुष आरमोरी, ५३ वर्षीय पुरुष ता. देसाईगंज, ६२ वर्षीय पुरुष ता. ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर, ६५ वर्षीय पुरुष जारावंडी ता. एटापल्ली, ६४ वर्षीय पुरुष धानोरा यांचा समावेश आहे.

नवीन ६२२ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १८२, अहेरी ३८, आरमोरी ४६, भामरागड १८, चामोर्शी ३३, धानोरा २६, एटापल्ली ३६, कोरची ४२, कुरखेडा ४१, मुलचेरा २३, सिरोंचा ५० तर देसाईगंज तालुक्यातील ८७ जणांचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या २८९ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील १७२, अहेरी ९, आरमोरी ३४, चामोर्शी ११, धानोरा ८, एटापल्ली ५, मुलचेरा ७, सिरोंचा २, कोरची ७, कुरखेडा१४ तसेच देसाईगंज तालुक्यातील १९ जणांचा समावेश आहे.

Web Title: 21 killed, 622 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.