२१२ शिक्षकांवर कारवाई होणार

By admin | Published: June 11, 2014 12:03 AM2014-06-11T00:03:05+5:302014-06-11T00:03:05+5:30

जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बनावट व नियमबाह्य बदल्यांचा घोटाळा गाजला होता. या प्रकरणी एका स्वयंसेवी संस्थेने शासनाकडे दोषी शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती.

212 teachers will be prosecuted | २१२ शिक्षकांवर कारवाई होणार

२१२ शिक्षकांवर कारवाई होणार

Next

बनावट बदली प्रकरण : विभागीय आयुक्तांच्या निर्देशाने शिक्षण खात्यात खळबळ
गडचिरोली : जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बनावट व नियमबाह्य बदल्यांचा घोटाळा गाजला होता. या प्रकरणी एका स्वयंसेवी संस्थेने शासनाकडे दोषी शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन विभागीय आयुक्तांनी बनावट बदली झालेल्या २१२ शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात खळबळ माजली आहे.
मागील सत्रात जिल्हा परिषदेत तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी व काही पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने वर्षभर शिक्षकांच्या बनावट बदल्या केल्या. यामध्ये ५ कोटी रूपयाची उलाढाल झाल्याचा आरोप अनेक शिक्षकांकडून करण्यात आला होता. वर्षभर झालेल्या शिक्षकांच्या बदली आदेशावर संदर्भ नसणे, बनावट जावक क्रमांक टाकणे, आयुक्ताची पुर्वपरवानगी न घेता बदल्या करणे, राजकीय पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीचा संदर्भ बदली आदेशावर टाकणे तसेच २५ आॅक्टोबर २०१३ च्या शासन निर्णयानुसार केवळ ८ शिक्षकांशी सामजस्य आपसी बदलीसाठी नोटशीट असतांना १०० पेक्षा अधिक शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या करण्यात आल्या. या बदली आदेशावर जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्कॅनिंग केल्याचे आदेश काढणे असे प्रकार घडले. यामुळे शहरी भागातून दुर्गम भागात गेलेले शिक्षक, केंद्रप्रमुख पदवीधर शिक्षकांना दोन ते अडीच लाख शिक्षकांना दोन महिन्यातच शहरी भागातील शाळेवर पदस्थापना देण्याचे आदेशही काढण्यात आले. यामुळे दुर्गम भागातील अनेक शाळा शिक्षकाअभावी ओसाड पडल्या. परिणामी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले.
या प्रकरणाबाबत शासनाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या. यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाने मागील महिन्यात जिल्हा परिषदेमध्ये चौकशी समिती पाठविली. यामध्ये बनावट बदल्यावर ठपका ठेवून शिक्षण विभागावर कडक ताशेरे ओढण्यात आले. या प्रकरणात २१२ शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या झाल्याचे लक्षात आले. यामुळे या २१२ शिक्षकांवर कारवाई होण्याचे संकेत आहेत.
सदर बनावट बदली प्रकरण उजेडात आल्यामुळे या प्रकरणातील दोषी अधिकारी व शिक्षकांचे कारवाईच्या भीतीने धाबे दणाणले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी बनावट बदली केलेल्या शिक्षकांवर तातडीने कारवाई करावी. तसेच या प्रकरणातील टोळीचा पर्दाफाश करावा, अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांनी केली आहे.
(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 212 teachers will be prosecuted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.