२२ गावांतील दहन भूमींचा होणार विकास

By admin | Published: June 26, 2017 01:05 AM2017-06-26T01:05:08+5:302017-06-26T01:05:08+5:30

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील २२ गावांमधील दहन-दफन भूमीच्या कामांना

22 development of combustible land in villages | २२ गावांतील दहन भूमींचा होणार विकास

२२ गावांतील दहन भूमींचा होणार विकास

Next

दीड कोटींची कामे मंजूर : जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून होणार कामे
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील २२ गावांमधील दहन-दफन भूमीच्या कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. तब्बल दीड कोटी रूपयाच्या निधीतून २२ गावातील स्मशानभूमीत सोयीसुविधा होणार आहेत.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत गडचिरोली तालुक्यातील हलामी टोला, पोटेगाव, बेलगाव, अमिर्झा येथे प्रत्येकी पाच लाख रूपयांचे काम मंजूर करण्यात आले आहे. नगरी, वसा, राजगाटा चक येथे प्रत्येकी १० लाख रूपयांतून स्मशानभूमीचे काम मंजूर झाले आहे. चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा, अड्याळ, वाकडी, कळमगाव, चितेकनार येथे प्रत्येकी पाच लाख रूपयातून तर मक्केपल्ली माल १० व पेटतळा गावात १० लाख रूपयांतून स्मशानभूमीचे काम मंजूर करण्यात आले आहे. धानोरा तालुक्यातील कारवाफा, रांगी येथे प्रत्येकी १० लाख तर फुलबोडी, राजोली, तुकूम, देवसरा येथे प्रत्येकी पाच लाख रूपयांतून स्मशानभूमीचे काम होणार आहे. या सर्व गावांना दहन व दफन भूमीच्या विकासासाठी निधी प्राप्त झाला आहे. आ. डॉ. देवराव होळी यांच्या प्रयत्नाने हे काम मंजूर करण्यात आले आहे. आ. डॉ. होळी यांनी सन २०१७-१८ वर्षातही स्मशानभूमीची कामे प्रस्तावित केली आहेत.

या होतील सुविधा
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील अनेक दहन, दफन भूमीकडे जाण्यासाठी पक्के रस्ते नाही, शिवाय त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. आता २२ गावांतील दहन व दफन भूमीचे काम मंजूर करण्यात आले आहे. येथे शेड, हातपंप, रस्ते आदींची कामे होणार आहेत.

 

Web Title: 22 development of combustible land in villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.