अनंतपूर येथे २३ लाखांची कामे मंजूर
By admin | Published: December 28, 2015 01:41 AM2015-12-28T01:41:20+5:302015-12-28T01:41:20+5:30
चामोर्शी तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या अनंतपूर येथे २३ लाख १४ हजार ९०० रूपयांची रोहयोची कामे मंजूर झाले आहेत.
२४६ मजूर कामावर : पाच गावांना रोजगार
आमगाव (म.) : चामोर्शी तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या अनंतपूर येथे २३ लाख १४ हजार ९०० रूपयांची रोहयोची कामे मंजूर झाले आहेत. या कामांना सुरूवातही झाली असून सद्य:स्थितीत २४६ मजूर कामावर आहेत.
मजगी कामाचे भूमिपूजन पं.स. सदस्य सुरेंद्र सोमनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विसापूरच्या सरपंच जयश्री मुकेश दुधबळे, उपसरपंच उदयसिंग धिरबसी, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पिपरे, जानूजी बोदलकर, खोजेंद्र सातपुते, मोरेश्वर वासेकर, काशिनाथ बुरांडे, सुनिल बोदलकर, संजय कोहळे, विलास वासेकर, रामचंद्र पदा, विलास भांडेकर आदी उपस्थित होते. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पदा टोला ते लसनपेटच्या नाल्यापर्यंत रस्त्याचे काम चालू आहे. त्यावर १८५ मजूर काम करीत आहेत. या कामासाठी २१ लाख २४ हजार ६६५ रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. आनंदराव वासेकर यांच्या शेतात मजगीचे काम सुरू असून त्यावर ६१ मजूर काम करीत आहेत. यासाठी १ लाख ९० हजारांचा निधी मंजूर झाला आहे. रस्त्याच्या कामावर रेखेगाव, अनंतपूर, निमडर, कुदर्शीटोला, पदाटोला या पाच गावातील नागरिक काम करीत आहेत. बांधकाम पूर्ण होईपर्यंत काम केले जाईल, अशी माहिती ग्रामपंचायतचे रोजगार सेवक राजू शेंडे यांनी दिली आहे. दोन्ही कामांची पाहणी ग्रामीणी रोजगार सेवक कोहरसिंग बसी यांच्या वतीने करण्यात येत आहे. (वार्ताहर)