ट्रॅक्टर उलटून २४ व-हाडी जखमी; साक्षगंधावरून परतताना अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 19:21 IST2020-02-01T19:21:44+5:302020-02-01T19:21:51+5:30
साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपून परत येत असताना ट्रॅक्टर उलटल्याने २४ व-हाडी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडला.

ट्रॅक्टर उलटून २४ व-हाडी जखमी; साक्षगंधावरून परतताना अपघात
कुरखेडा : साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपून परत येत असताना ट्रॅक्टर उलटल्याने २४ व-हाडी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडला. सदर अपघात भटेगाव-सोनपूर मार्गावर घडली. रामगड गट ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या जामटोला येथील खूशाल मडावी याचा साक्षगंध धानोरा तालुक्यातील मांगदा येथे होता. कार्यक्रमासाठी व-हाडी ट्रॅक्टरने गेले होते. कार्यक्रम आटोपून परत येत असताना ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक्टर उलटले.
या अपघातात धनीराम नैताम (६५), तूकाराम नैताम (६०), उद्धव बावाणकर (४०), प्रफूल होळी (२५), अजय मडावी (१८), जमनाबाई कूमोटी (४५), सिताराम कोल्हे (६०), कैलाश केरामी (३५), लिलाधर नैताम (२०), लोमेश नैताम(२०), राजेंद्र होळी (३५), कलीराम होळी (६०), अंकूश कोल्हे (१९), निशांत होळी (१९), समीर मडावी (१६), मधूकर नैताम (२६), राजीराम मडावी (४०), शामराव मडावी (४५), अरूण नैताम (४०) सर्व राहणार जामटोला, मिथून नैताम (२०) व रामसू नैताम (४५) रा. हेटीनगर, मुक्ताबाई मडावी (५०) रा लक्ष्मीनगर, करण दर्रो (१७) रा. बिजापुर राजनसाय उसेंडी (६५) रा. वाघदरा हे जखमी झाले.
धनीराम नैताम यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे. तर उर्वरीत जखमींवर कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहेत. काही जखमींना गुप्त मार असल्याने त्यांना सूद्धा वैद्यकीय चाचणी करिता जिल्हा रूग्णालयात हलविण्याचा सल्ला येथील वैद्यकीय अधिकाºयांनी दिला आहे. अपघाताची माहीती मिळताच पं. स. सदस्य मनोज दुनेदार यांनी रूग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली.