वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गासाठी २४ पर्यंत जागेची दरनिश्चिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:28 AM2017-11-22T00:28:51+5:302017-11-22T00:29:24+5:30

Up to 24 seats for Wadsa-Gadchiroli railway route | वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गासाठी २४ पर्यंत जागेची दरनिश्चिती

वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गासाठी २४ पर्यंत जागेची दरनिश्चिती

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या याद्या तयार : वाटाघाटीतून भूसंपादनाला प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वडसा (देसाईगंज) ते गडचिरोली मार्गाचे काम निर्धारित वेळेपूर्वी काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या रेल्वेमार्गासाठी वाटाघाटीने जमीन खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी नगर रचना विभाग २४ नोव्हेंबरपर्यंत जागेची दर निश्चिती करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले.
या रेल्वेमार्गासाठी ज्या व्यक्तींची जमीन खरेदी करावयाची आहे त्याचा मालकी हक्क अधिकार तपासून पाहण्याचे काम विधिज्ञांमार्फत पूर्ण झाले आहे. या जमिनींच्या संपादनाच्या सर्व बाजूंची चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक यांनी सर्व संबंधितांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या. या जमिनींच्या दर निश्चितीचे काम नगर रचना विभागाकडून सुरू आहे. हे काम शुक्र वार २४ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर सोमवार २७ नोव्हेंबरपासून गावनिहाय शेतकºयांना वाटाघाटीसाठी बोलावण्यात येणार आहे. वाटाघाटीव्दारे भूसंपादनाची प्रक्रिया वडसा तसेच गडचिरोली येथील उपविभागीय कार्यालयांमध्ये होणार आहे.
ज्यांची जमीन या कामात संपादन करायची आहे त्या सर्व शेतकºयांची नावे सर्व्हे क्रमांकासह उद्घोषणेत जाहीर करण्यात आली आहेत. उपविभागीय अधिकारी गडचिरोली आणि वडसा यांच्या कार्यालयांमध्ये या याद्या उपलब्ध करु न देण्यात आलेल्या आहेत. दिलेल्या वेळेत काम पूर्ण होण्याच्या दृष्टीकोणातून सर्व स्तरावर खबरदारी घेण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फेजिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी कळविले.

Web Title: Up to 24 seats for Wadsa-Gadchiroli railway route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.