दररोज २४ टन कचऱ्याची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 06:00 AM2020-03-01T06:00:00+5:302020-03-01T06:00:34+5:30

अर्ध्याअधिक रोगांचा प्रसार परिसरात असलेल्या दुर्गंधीमुळे होतो. त्यामुळे मानवी वस्तीत दुर्गंधी राहणार नाही यासाठी केंद्र व राज्य शासन विशेष आग्रही आहे. केंद्र शासनामार्फत स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी प्रत्येक शहराला तसेच गावाला कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. स्वच्छतेबाबत अजुनही नागरिकांमध्ये जनजागृती झालेली नाही.

24 tonnes of waste daily | दररोज २४ टन कचऱ्याची भर

दररोज २४ टन कचऱ्याची भर

googlenewsNext
ठळक मुद्देप्लास्टिकचे सर्वाधिक प्रमाण । गडचिरोलीतील डम्पिंग यार्डवर निर्माण झाले आहेत मोठमोठे ढीग

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोलीकर दरदिवशी सुमारे २४ टन कचरा निर्माण करतात. सदर कचरा घंटागाड्यांच्या माध्यमातून खरपुंडी मार्गावर असलेल्या डम्पिंग यार्डवर नेऊन टाकला जातो. त्यामुळे डम्पिंग यार्डवर कचऱ्याचे मोठमोठे ढिग निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे, या कचऱ्याचे वर्गीकरण केले जात नसल्याने कचºयाची समस्या आणखी गंभीर झाली आहे. सोबतच त्याची परिसरात दुर्गंधी पसरत आहे.
अर्ध्याअधिक रोगांचा प्रसार परिसरात असलेल्या दुर्गंधीमुळे होतो. त्यामुळे मानवी वस्तीत दुर्गंधी राहणार नाही यासाठी केंद्र व राज्य शासन विशेष आग्रही आहे. केंद्र शासनामार्फत स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी प्रत्येक शहराला तसेच गावाला कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. स्वच्छतेबाबत अजुनही नागरिकांमध्ये जनजागृती झालेली नाही.
प्रत्येक व्यक्ती आपल्या गरजा पूर्ण करताना काही प्रमाणात कचरा निर्माण करतात. कचरा निर्माण होणे ही स्वाभाविक बाब आहे. फळांची साल, भाजीपाला इत्यादीच्या माध्यमातून तयार होणाऱ्या कचऱ्याला ओला कचरा संबोधले जाते. तर या कचराव्यतिरिक्त प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घरातील एखादी वापराची वस्तू याला सुका कचरा म्हटले जाते. घरात निर्माण झालेला कचरा दोन वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये साठविणे आवश्यक आहे. मात्र असे होताना दिसत नाही.
डम्पिंग यार्डवर सर्व कचरा एकत्र राहतो. त्यातून दुर्गंधी पसरत आहे. याच परिसरात एक शाळा असल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांवर या दुर्गंधीमुळे प्रकृती बिघडण्याची वेळ आली आहे. जमा होणाऱ्या एकूण कचऱ्यामध्ये ५० टक्केपेक्षा अधिक कचरा प्लास्टिकचा राहतो. शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे. तरीही सदर प्लास्टिक वापरले जात असल्याचा पुरावा येथे पहायला मिळतो. विशेष म्हणजे, एकदा तयार झालेली प्लास्टिक किमान ५०० वर्ष जमिनीत कुजत नाही. एक ते दोन वर्ष तर रंग सुध्दा जात नाही. त्यामुळे प्लास्टिकची समस्या गंभीर होणार आहे. शक्यतो प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन नगर परिषद व शासनामार्फत करण्यात येत असले तरी प्रत्येक व्यक्ती प्लास्टिकचा वापर करीत असल्याचे दिसून येते. एकूण कचऱ्यामध्ये ५० टक्केहून अधिक कचरा केवळ प्लास्टिकचा राहते. त्यामुळे डम्पिंग यार्डवर जिकडे तिकडे प्लास्टिकचे ढीग दिसून येतात.

कचऱ्याचे वर्गीकरण करणे आवश्यक
प्रत्येक घरात दोन कचराकुंड्या ठेवून ओला व सुका कचरा दोन वेगवेगळ्या कचराकुंड्यांमध्ये ठेवावा. मात्र असे वर्गीकरण नागरिक करीत नाही. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करता येते. तर सुक्या कचऱ्यावर वेगवेगळी प्रक्रिया करता येते. कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी नगर परिषदेला लाखो रुपये खर्च करावे लागतात.

ओला व सुका कचरा दोन वेगवेगळ्या डब्यांमध्ये टाकावा, या विषयी नगर परिषदेमार्फत जागृती केली आहे. तरीही नागरिक एकाच ठिकाणी कचरा गोळा करतात. कचºयाचे वर्गीकरण करणे ही अतिशय कष्टप्रद व खर्चीक बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करूनच तो घंटागाडीत टाकावा.
- संजीव ओहोळ, मुख्याधिकारी, नगर परिषद गडचिरोली

Web Title: 24 tonnes of waste daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dumpingकचरा