२५ निराधारांना मिळणार अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:36 AM2021-07-31T04:36:54+5:302021-07-31T04:36:54+5:30
सामाजिक न्याय विभागाच्यावतीने समाजातील निराधार व्यक्तींना अर्थसहाय्य दिले जाते. संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीला संजय गांधी निराधार अनुदान ...
सामाजिक न्याय विभागाच्यावतीने समाजातील निराधार व्यक्तींना अर्थसहाय्य दिले जाते. संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीला संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत १३ प्रकरणांपैकी १२ प्रकरणे मंजूर व १ प्रकरण नामंजूर करण्यात आले. श्रावणबाळ या राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत प्राप्त ७ प्रकरणांपैकी ५ प्रकरणे मंजूर व २ नामंजूर करण्यात आली. केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेअंतर्गत प्राप्त ६ प्रकरणांपैकी ५ प्रकरणे मंजूर व १ नामंजूर करण्यात आली. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत प्राप्त ३ प्रकरणांपैकी सर्वच प्रकरणे मंजूर करण्यात आली.
या बैठकीला संजय गांधी निराधार अनुदान समितीचे शासकीय/अशासकीय सदस्य शांताबाई परसे, राजू ठाकरे, कल्पना सहारे, प्रकाश मारभते, किरण शेडमाके, बाबूराव गेडाम, लालाजी परसा, सहायक गटविकास अधिकारी एन. एच. बाबर, गुलाय ठाकरे, समितीचे सदस्य, सचिव, तहसीलदार सी.जी. पित्तुलवार, नायब तहसीलदार धनराज बाकुलकर, कारकुन महानंदा मडावी, महसूल सहायक पराग खोब्रागडे आदी उपस्थित हाेते.
290721\2004img-20210729-wa0030.jpg
संजय गांधी निराधार अनुदान समितीची सभा