भरधाव वाहन उलटून २५ भाविक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:38 AM2018-02-21T01:38:08+5:302018-02-21T01:38:57+5:30
कुनघाडा फाट्याजवळ प्रवासी घेऊन जात असलेले वाहन पलटल्याने २५ भाविक जखमी झाल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोधी मो. : कुनघाडा फाट्याजवळ प्रवासी घेऊन जात असलेले वाहन पलटल्याने २५ भाविक जखमी झाल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता घडली.
चामोर्शी तालुक्यातीलच रामाळा येथे सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी दर्शनी, माल्लेरमाल व कुनघाडा येथील जवळपास २५ भाविक एमएच ३३ टी ०१५२ क्रमांकाच्या पीकअप वाहनाने जात होते. यावेळी आकाश दादाजी येलमुले हा वाहन चालवित होता. कुनघाडा फाटा ते तळोधी मार्गावर नंदेश्वर मंदिराजवळ वाहन चालकाने जोराने ब्रेक दाबले. यामुळे वाहन उलटले. वाहन उलटल्यानंतर चालकाने वाहन घटानास्थळीच सोडून पळ काढला. अपघातात माल्लेरमाल येथील इंदिरा मेडपल्लीवार, रूक्मिणी चौधरी, सोनी मेडपल्लीवार, गयाबाई मरापे, प्रेमिला मरापे, पल्लवी मोहुर्ले, कुनघाडा येथील अशोक पालकर, भूमिका पालकर, सोनाबाई वाघाडे, छायाबाई दुधबळे, सुरेश बावणे, कुसूम टिकले, कोकीळा चापले, दर्शनी येथील उमाजी भोयर, माया कस्तुरे, सुनीता पुरी, यशवंत बोबाटे, चंद्रकला मुलतानी, प्रकाश पुरी यांच्यासह इतर आठ जण जखमी झाले. यातील कोकीळा चापले यांची प्रकृती गंभीर आहे.