एसटीच्या २५ बसेस विजेवर धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:18 AM2021-09-02T05:18:49+5:302021-09-02T05:18:49+5:30
एसटीचा सर्वात माेठा खर्च डिझेलवर हाेते. इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या बसेस खरेदी केल्यास एसटीचा खर्च कमी हाेईल असा अंदाज आहे. त्याच ...
एसटीचा सर्वात माेठा खर्च डिझेलवर हाेते. इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या बसेस खरेदी केल्यास एसटीचा खर्च कमी हाेईल असा अंदाज आहे. त्याच दृष्टीने इलेक्ट्रिक बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. एसटीने आजपर्यंत अनेक प्रयाेग केले आहेत. यातील काही प्रयाेग यशस्वी झाले तर काही प्रयाेग फसले आहेत. आता हा प्रयाेग यशस्वी हाेणार काय, याकडे लक्ष लागले आहे.
(बाॅक्स)
या मार्गांवर धावणार बसेस
गडचिराेली आगारातील बसेसला सर्वाधिक उत्पन्न चंद्रपूर व नागपूर मार्गावरून मिळते. त्यामुळे या दाेनच मार्गावर सर्वप्रथम बसेस चालविल्या जाणार आहेत.
(बाॅक्स)
काेठे राहणार चार्जिंग सेंटर?
गडचिराेली जिल्ह्यात गडचिराेली येथेच चार्जिंग सेंटर राहणार आहे. तसेच नागपूर व चंद्रपूर येथेही चार्जिंग सेंटर राहील. त्या ठिकाणीही काहीवेळ बॅटरी चार्जिंग केली जाईल.
(बाॅक्स)
आणखी सहा महिने लागणार
इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या बसेस प्रत्येक विभागाला किती लागतील याची माहिती मागविण्यात आली आहे. त्यानंतर एखाद्या कंपनीला ऑर्डर दिली जाणार आहे. बसेस प्राप्त हाेण्यास किमान सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
(काेट)
एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या किती बसेस लागतील याबाबतची माहिती मागवली हाेती. ती पाठविण्यात आली आहे. इलेक्ट्रिक बसमुळे एसटीचा खर्च कमी हाेण्यास मदत हाेईल असा अंदाज आहे.
- संजय सुर्वे, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, गडचिराेली