२,५०९ शेततळ्यांतून सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:20 AM2018-04-19T01:20:50+5:302018-04-19T01:20:50+5:30

मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत कृषी विभागाने एकूण ५ हजार ४०७ शेतकऱ्यांना शेततळे मंजूर केले. त्यापैकी ३१ मार्चपर्यंत २ हजार ५०९ शेततळ्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यातून आता सिंचन होत आहे.

2,509 irrigation from the peasants | २,५०९ शेततळ्यांतून सिंचन

२,५०९ शेततळ्यांतून सिंचन

Next
ठळक मुद्देउद्दिष्टापेक्षा दुप्पट काम : मागेल त्याला शेततळे योजना; ५,४०७ शेततळे मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत कृषी विभागाने एकूण ५ हजार ४०७ शेतकऱ्यांना शेततळे मंजूर केले. त्यापैकी ३१ मार्चपर्यंत २ हजार ५०९ शेततळ्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यातून आता सिंचन होत आहे.
शेततळ्यांमुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होते. त्याचबरोब अडचणीच्या वेळी पिकांना पाणी देणे हे दुहेरी उद्देश साध्य होत असल्यामुळे शासनाने मागेल त्या शेतकºयाला शेततळे देण्याची योजना सन २०१६-१७ मध्ये सुरू केली. या योजनेला गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक चांगला प्रतिसाद मिळाला. योजनेच्या सुरुवातीपासून ते १६ एप्रिलपर्यंत सुमारे ७ हजार ७३० शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी अर्ज केला. कृषी विभागाला प्राप्त झालेल्या एकूण अर्जांपैैकी ७ हजार ६३४ शेतकऱ्यांनी सेवा शुल्क जमा केले. अर्जांच्या छाननीनंतर ७ हजार ९४ अर्ज पात्र ठरले. कृषी विभागाने प्रत्यक्ष पाहणी शेताची पाहणी केल्यानंतर ५ हजार ७४१ शेतकऱ्यांनी सूचविलेल्या जागा शेततळे खोदण्यासाठी योग्य आढळल्या. तर २९७ जागा अयोग्य आढळल्या. २४१ शेतकºयांच्या जागांची तपासणी होणे बाकी आहे.
छाननी अर्ज व जागेची पाहणी केल्यानंतर ५ हजार ४०७ शेतकऱ्यांच्या अर्जांना मंजुरी प्रदान केली. त्यापैकी ३ हजार ५२७ शेतकºयांना शेततळे बांधण्यासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. मागील दोन वर्षाच्या कालावधीनंतर ३१ मार्चपर्यंत २ हजार ५०९ शेततळ्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
राज्यात गडचिरोली जिल्हा आघाडीवर
गडचिरोली जिल्ह्याला केवळ १ हजार ४०० शेततळे खोदण्याचे उद्दिष्ट दिले होते. मात्र प्रत्यक्षात २ हजार ५०९ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेततळे पूर्ण करणारा गडचिरोली हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत ३ हजार ५०० शेततळे पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सिंचन प्रकल्प नाही. धानाला मोठ्या प्रमाणात सिंचनाची गरज भासते. एका पाण्याने पीक मरते. या कालावधीत पिकाला पाणी देता यावे, यासाठी शेततळे खोदले जात आहेत.

Web Title: 2,509 irrigation from the peasants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.