मुलचेरा तालुक्यात २६७ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:37 AM2021-01-19T04:37:32+5:302021-01-19T04:37:32+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क मुलचेरा : तालुक्यात एकूण १६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ११२ जागांसाठी ...

267 candidates in fray in Mulchera taluka | मुलचेरा तालुक्यात २६७ उमेदवार रिंगणात

मुलचेरा तालुक्यात २६७ उमेदवार रिंगणात

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुलचेरा : तालुक्यात एकूण १६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ११२ जागांसाठी २६७ उमेदवार रिंगणात आहेत.

१६ ग्रामपंचायतींमध्ये एकूण ५७ प्रभाग आहेत. १५८ सदस्य निवडून द्यायचे आहेत. ३२३ जणांनी नामनिर्देशनपत्र सादर केले हाेते. ३० जणांनी नामनिर्देशनपत्र मागे घेतले, तर २६ सदस्यांची बिनविराेध निवड झाली. आता केवळ ११२ जागांसाठी मतदान हाेणार आहे. २६७ उमेदवार रिंगणात आहेत. दाेन ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविराेध झाली आहे. यावर्षीच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत युवा वर्ग पुढे आला आहे. त्यामुळे अपवाद वगळता प्रत्येकच गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. २० जानेवारी राेजी मतदान हाेणार आहे. मुलचेरा तालुक्यातील सदस्यांना प्रचारासाठी जवळपास ९ ते १० दिवसांचा कालावधी मिळाला. सरपंच पदाची निवड करताना अडचण जाऊ नये म्हणून गावातील समविचारी युवकांनी एकत्र येत पॅनेल तयार केले आहेत. या पॅनेलच्या माध्यमातून गावात प्रचार सुरू आहे. गावात निवडणुकीचे बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच साेशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रचार केला जात आहे. तांत्रिक साधनांचा वापर हाेत आहे.

Web Title: 267 candidates in fray in Mulchera taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.