२८ टक्के गुरुजींची शाळेत हजेरीला दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:25 AM2021-06-17T04:25:33+5:302021-06-17T04:25:33+5:30
जिल्ह्यात शाळा आणि शिक्षक प्राथमिक शाळा १४६४ माध्यमिक शाळा ३९४ प्राथमिक शिक्षक ३९०५ माध्यमिक शिक्षक २८५२ काेराेना काळात शाळा ...
जिल्ह्यात शाळा आणि शिक्षक
प्राथमिक शाळा १४६४
माध्यमिक शाळा ३९४
प्राथमिक शिक्षक ३९०५
माध्यमिक शिक्षक २८५२
काेराेना काळात शाळा बंद हाेत्या. मात्र शिक्षकांना मुख्यालयी राहण्याचे सक्त आदेश देण्यात आले हाेते. शिक्षकांच्या काेविडबाबत ड्युट्या लावण्यात आल्या हाेत्या. तालुका प्रशासनाच्या आदेशानुसार जि.प. शाळांचे शिक्षक गावात फिरून काेराेनाबाबत जनजागृती करीत हाेते. काही शिक्षकांची शाळांमधील विलगीकरण कक्ष तसेच गावाच्या सीमेवर ड्युट्या लावण्यात आल्या हाेत्या.
- हेमलता परसा, प्राथमिक शिक्षणाधिकारी जि.प. गडचिराेली
काेराेना काळात काही दिवसांनंतर ५० टक्के शिक्षक उपस्थितीचा आदेश निघाला. दरम्यान, एक दिवसाआड माध्यमिक शिक्षक शाळांमध्ये हजेरी लावून ते कर्तव्य पार पाडत हाेते. ऑनलाइन शिक्षण कार्यासाेबतच काेविडबाबतची कामे शिक्षकांनी केली.
- रमेश उचे, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, जि.प. गडचिराेली
शिक्षक म्हणतात...
काेराेना प्रादुर्भावामुळे गतवर्षीच्या शैक्षणिक सत्रात इयत्ता चाैथीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्ष भरले नाहीत. प्रशासनाच्या आदेशानुसार, आमच्या शाळेत पाचवी ते सातवीचे वर्ग काही दिवस भरले. शाळा बंद असल्या तरी माझ्यासह सहकारी शिक्षक शाळेत हजेरी लावत हाेताे. काेविडबाबतची कामे करून ऑनलाइन शिक्षणासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
- राजेंद्र घुगरे, मुख्याध्यापक, जि.प. शाळा नगरी
शाळा बंद असल्या तरी आमची ड्युटी सुरू हाेती. आम्ही शाळेतील शिक्षक शाळेत गेल्यानंतर गावात जाऊन काेविडबाबत जनजागृती करीत हाेताे. दाेन शिक्षक शाळेत व दाेन गावात काेविडची कामे करीत हाेताे. दैनंदिन उपस्थितीकडे दुर्लक्ष केेले नाही.
- हिमांशू गेडाम, शिक्षक
लेखी तक्रार नाही
काेराेना संकटाच्या काळात शिक्षक अनुपस्थितीबाबत एकही लेखी तक्रार नाही, अशी माहिती प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी केली आहे. ऑनलाइन शिक्षणाबाबत पालकांच्या ताेंडी तक्रारी प्राप्त झाल्या. नेटवर्क नाही, कव्हरेज नाही, स्मार्टफाेनची अडचण आदी बाबी काही पालकांनी मांडल्या.